Maize Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Commodity Market : मका वधारणार; तूर, सोयाबीनमध्ये नरमाई

डॉ.अरूण कुलकर्णी

फ्यूचर्स किमती ः सप्ताह ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२४

मक्यासाठी २ सप्टेंबरपासून NCDEX मध्ये जानेवारी डिलिव्हरी व कापसासाठी MCX मध्ये मार्च डिलिव्हरी व्यवहार सुरू झाले. मक्याची मागणी चांगली आहे. त्यामुळे त्याच्या किमतीत गेली काही वर्षे वाढीचा कल होता; तो या वर्षीही कायम राहील असा अंदाज आहे. तूर, सोयाबीन व मूग यांच्या किमती सध्या कमी होत आहेत; पुढील काही दिवस त्या हाच कल दाखवतील.

६ सप्टेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मध्ये या महिन्यात कापसासाठी सप्टेंबर, नोव्हेंबर, जानेवारी व मार्च डिलिव्हरी व्यवहार सुरू आहेत. स्पॉट बाजारात कापसाची आवक कमी होत आहे. किमतीत वाढता कल आहे. कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात २.१ टक्क्यांनी वाढून रु. ५८,४०० वर आले होते. या सप्ताहात ते ३ टक्क्यांनी वाढून रु. ६०,१४० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव ०.५ टक्क्याने वाढून रु. ५८,७०० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स भाव रु. ५८,००० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.६ टक्क्यांनी कमी आहेत. भविष्यात कापसाचे भाव कमी होतील असा अंदाज हे भाव दर्शवतात.

NCDEX मध्ये या महिन्यात कपाशीसाठी नोव्हेंबर, फेब्रुवारी व एप्रिल डिलिव्हरी व्यवहार सुरू आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात ०.८ टक्क्याने वाढून रु. १,६१४ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स मात्र ३.५ टक्क्यांनी घसरून रु. १,५२२ वर आले आहेत तर एप्रिल फ्यूचर्स रु. १,६२२ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा फक्त ०.४ टक्क्याने अधिक आहेत.

कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत. एप्रिल फ्यूचर्स हमीभावापेक्षा जवळ जवळ रु. १०० ने अधिक आहेत. हे भाव योग्य वाटल्यास व त्यावेळेस डिलीवरी देणे शक्य असेल तर एप्रिल फ्यूचर्स भाव हेजिंगसाठी अनुकूल आहेत.

मका

NCDEX मध्ये या महिन्यात मक्यासाठी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी डिलिव्हरी व्यवहार सुरू आहेत. NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात ०.६ टक्क्याने वाढून रु. २,५७० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्याने घसरून रु. २,५५० वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमती रु. २,५२१ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स रु. २,६०३ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव २.१ टक्क्यानी अधिक आहे. मक्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग नाही; मात्र हेजिंगसाठी या किमतींवर लक्ष ठेवावे. मक्याचा हमीभाव रु. २,२२५ आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत. हे किती अधिक आहेत ते बघून हेजिंगचा विचार करावा.

हळद

NCDEX मध्ये या महिन्यात हळदीसाठी ऑक्टोबर व डिसेंबर डिलिव्हरी व्यवहार सुरू आहेत. NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १४,११३ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी वाढून रु. १४,४२४ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमती रु. १४,०१४ वर आल्या आहेत. डिसेंबर किमती रु. १४,५९४ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.२ टक्क्याने अधिक आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ७,६२५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.७ टक्क्याने घसरून रु. ७,६७५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे; भाव वाढत आहेत.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) ०.३ टक्क्याने वाढून रु. ८,३०० वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. आवक वाढत आहे; किमती कमी होत आहेत.

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ३.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,७४७ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. किमतीतील उतरता कल कायम आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,१३८ वर आली होती. या सप्ताहात ती ०.९ टक्क्याने वाढून रु. १०,२२९ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. ३,७१४ होती; या सप्ताहात ती रु. ३,८६५ वर आली आहे. कांद्याच्या किमतीत वाढता तर आवकेत उतरता कल आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,१६७ वर आली होती. या सप्ताहात ती रु. १,६०० वर आली आहे. आवकेत उतरता कल आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT