Maize Update  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market : मका आयात निर्यातीपेक्षा जास्त

Maize Import : देशात इथेनॉलसाठी मक्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे मक्याचे भाव आंतरराष्ट्रीय भावापेक्षा अधिक आहेत. तसेच मक्याची आयातही वाढत आहे.

Anil Jadhao 

Pune News : देशात इथेनॉलसाठी मक्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे मक्याचे भाव आंतरराष्ट्रीय भावापेक्षा अधिक आहेत. तसेच मक्याची आयातही वाढत आहे. चालू वर्षात मक्याची आयात निर्यातीपेक्षा जास्त झाली. तसेच भाव वाढल्याने पोल्ट्री उद्योगाने आयात खुली करण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकारने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. सध्या हे प्रमाण १३ टक्के आहे. त्यासाठी देशात इथेनॉल निर्मिती वाढविण्याला सरकार प्रोत्साहन देत आहे. परंतु गेल्यावर्षी देशात उसाचे उत्पादन घटले. परिणामी साखरेचे उत्पादनही घटले. भारत साखरेचा मोठा ग्राहक आहे. देशांतर्गत गरज भागविण्यासाठी सरकारने थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली. तर धान्यापासून इथेनॉल निर्मितीसाठी धान्य उपलब्ध नव्हते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे देशात धान्याचेही उत्पादन कमी होऊन भाव वाढले. त्यामुळे इथेनॉलसाठी मक्याचा पर्याय उरला.

मक्यापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारने जानेवारीत मक्यापासून निर्माण होणाऱ्या इथेनॉलचे भाव वाढवले आहेत. त्यामुळे इथेनॉल उद्योगाकडून मक्याची मागणी वाढली. देशात इथेनॉलसाठी मक्याचा वापर वाढला. मात्र देशातील मका उत्पादन घटले आहे. परिणामी देशात मक्याची आयात वाढली आहे. गेल्या १० वर्षांत पहिल्यांच मका आयात निर्यातीपेक्षा जास्त झाली.

भारत दरवर्षी २० लाख ते ४० लाख टनांच्या दरम्यान मक्याची निर्यात करत असतो. परंतु यंदा मक्याची निर्यात ४ लाख ५० हजार टनांच्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता आहे. तर आयात १ लाख टनांवर पोहोचेल. भारतात सध्या मक्याची आयात म्यानमार आणि युक्रेनमधून होत आहे. कारण या देशांमध्ये नॉन जीएम मका उपलब्ध आहे. भारतात जीएम मका आयातीवर ६० टक्के आयात शुल्क आहे.

सरकारने इथेनॉलसाठी मक्याचा वापर करण्यास परवानगी दिल्यानंतर उद्योगांची मागणी वाढली. याचा फटका पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाला बसत असल्याचे या उद्योगांचे म्हणणे आहे. देशात गेल्या वर्षात ३५६ लाख टन मका उत्पादन झाले होते. तर पोल्ट्री उद्योगाचा मका वापर जवळपास १६० लाख टन आहे. पण इथेनॉलसाठी मक्याला मागणी वाढल्याने पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाला मक्याची टंचाई जाणवत आहे.

तसेच मक्याची टंचाई असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा मक्याचे भाव भारतात जास्त आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचा भाव १४०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे. तर देशातील भाव २२०० रुपयांच्या दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय बाजारत मक्याचे भाव कमी असल्याने सरकारने जीएम मका आयात खुली करावी, अशी मागणी पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाने केली. यापूर्वी सरकारने १५ टक्के आयातशुल्काने ५ लाख टन आयातीला परवानगी दिली. पण उद्योगांची मागणी आयात खुली करण्याची आहे.

वर्षनिहाय मक्याची आयात आणि निर्यात (लाख टनांत)

वर्ष आयात निर्यात

२०२४ १० ४.५

२०२३ ०.०१ २.३१

२०२२ ०.०२ ३.५

२०२१ ०.०२ ३.७१

२०२० ०.२३ ०.३७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season 2024 : दामाजी, विठ्ठलराव शिंदे कारखान्यांचा वाहतूक खर्च कमी

Latur Voting Percentage : वाढलेल्या मताच्या टक्क्याचा कोणाला बसणार?

Nashik Assembly Voting : नाशिक जिल्ह्यात सरासरी ६७.९७ टक्के मतदान

Agriculture Irrigation : सिंचन योजनेतून शेतीसाठी २१ टीएमसी पाणी

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

SCROLL FOR NEXT