Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापसाची आवक कमी; खेडा खरेदी दर नीचांकी

Cotton Rate Update : खानदेशात कापसाची आवक कमी आहे. रोज १८ ते २० हजार क्विंटल कापूस बाजारात येत असून, खेडा खरेदी दर नीचांकी स्थितीत आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात कापसाची आवक कमी आहे. रोज १८ ते २० हजार क्विंटल कापूस बाजारात येत असून, खेडा खरेदी दर नीचांकी स्थितीत आहेत.सध्या सरकीचे दरही कमी आहेत. सरकी दरात सुधारणा झालेली नाही. यामुळे कापसाचे दर खानदेशात दबावातच किंवा अपेक्षित नसल्याची स्थिती आहे.

खेडा खरेदीत कापसाला सध्या प्रतिक्विंटल ६२०० ते ६५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. खानदेशात कापसाची बाजार समित्यांत कुठलीही आवक होत नाही. कमाल कापसाची थेट किंवा खेडा खरेदी केली जाते. खेडा दरात मागील महिनाभरात कुठलीही सुधारणा झालेली नाही. मध्यंतरी कापसाचे दर प्रतिक्विंटल ५५०० ते ६१०० रुपये असे खेडा खरेदीत दिले जात होते.

कापसाची आवक महिनाभरात काहीशी वाढली आहे. २० ते २२ दिवसांपूर्वी खानदेशात रोज १२ ते १५ हजार क्विंटल कापसाची आवक होत होती. त्यात मागील काही दिवसांत वाढ झाली असून, सध्या आवक कमाल २० हजार क्विंटल एवढी आहे. रोज तीन ते चार हजार कापूस गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्मिती खानदेशात होत आहे.

हमीभाव मिळेना

खानदेशात खेडा खरेदीत यंदा कापसाची हमीभावात खरेदी सुरू नाही. शासनाने हमीभाव कसे मिळतील, याची दक्षता घेतलेली नाही. अलीकडेच कापूस महामंडळाने खरेदी सुरू केली आहे. पण ती खरेदी तोकडी आहे. शेतकऱ्यास खानदेशात खेडा खरेदीत हमीभावाऐवढा दर कापसासंबंधी मिळालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी व सरकारविषयी रोष आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

Sericulture Farming: ‘ए ग्रेड’ रेशीम कोष उत्पादन हेच जाधव यांचे वैशिष्ट्य

CSR Funding Issue: सीएसआर निधी खर्चातील विसंगती

Festival Noise Pollution: गोंगाटात हरवलेला उत्सव

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

SCROLL FOR NEXT