Cotton Market : परभणी बाजार समितीमध्ये २३ हजार क्विंटलवर कापूस खरेदी

Cotton Rate : परभणी बाजार समितीअंतर्गत ‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र गंगाखेड रस्त्यावरील सिंगणापूर फाटा येथील जिनिंग कारखान्यामध्ये आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत गुरुवार (ता. २८) पर्यंत भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) तर्फे २९६ शेतकऱ्यांकडून ५ हजार ७२५ क्विंटल आणि खासगी खरेदीदारांकडून सुमारे १८ हजार क्विंटल मिळून एकूण २३ हजार ७२५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. ‘सीसीआय’ने कापसाला प्रतिक्विंटल किमान ७३०० ते कमाल ७४९० रुपये तर खासगी खरेदीदाराकडून प्रति क्विंटल किमान ७१४५ ते कमाल ७२३५ रुपये दर मिळाले.

परभणी बाजार समितीअंतर्गत ‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र गंगाखेड रस्त्यावरील सिंगणापूर फाटा येथील जिनिंग कारखान्यामध्ये आहे. सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्रीपूर्वी शेतकऱ्यांनी स्वतः बाजार समितीच्या कार्यालयात उपस्थित राहून ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

Cotton Market
Cotton Market : ‘सीसीआय’ केंद्रावर मुहूर्ताला १४ क्‍विंटल आवक

त्यासाठी कपाशीचा पेरा असलेला चालू वर्षीचा ७-१२ उतारा, मोबाइल क्रमांक संलग्न असलेले बँक खाते पासबुक, आधार कार्ड या कागदपत्रांच्या सत्यप्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. सीसीआयकडून प्रतिक्विंटल ८ ते १२ टक्के ओलावा असलेला कापूस खरेदी केला जात आहे.

शेतकऱ्यांनी स्वच्छ स्वरूपात विक्रीस आणावा, चांगल्या प्रतीचा कापूस वेगळा व खराब प्रतीचा कापूस वेगळा आणावा. परभणी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना, अनधिकृतपणे शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या आमिषाला बळी पडू नये.

Cotton Market
Cotton Market : वरोरा भागात कापसाला ७१५० रुपयांचा दर

परवानाधारक व्यापाऱ्यांना शेतीमालाची विक्री करून हिशेब पट्टी घ्यावी. अनधिकृतपणे शेतीमाल खरेदी-विक्रीचा व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध बाजार समिती कायदेशीर कारवाई करणार आहे.

शेतीमालाची विक्री केल्यानंतर हिशेब पट्टी मिळत नसल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन सभापती पंढरीनाथ घुले, उपसभापती अजय चव्हाण, सचिव संजय तळणीकर यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com