Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Price Drop : लातूरला सोयाबीनची आवक वाढल्याने भावात घसरण

Soybean Market : चार दिवसांत अडत बाजारात सोयाबीनची आवक वाढताच भाव घसरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आवकही कमी झाली असून शेतकऱ्यांना आता वाढणाऱ्या भावाची प्रतीक्षा आहे.

विकास गाढवे

Latur News : चार दिवसांत अडत बाजारात सोयाबीनची आवक वाढताच भाव घसरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आवकही कमी झाली असून शेतकऱ्यांना आता वाढणाऱ्या भावाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे सरकारने सुरू केलेल्या आधारभूत केंद्रावर अजून खरेदीला उत्साह आलेला नाही. बारदाना असूनही मॉईश्चरचे प्रमाण जास्त असल्याने खरेदी मंदावल्याचे चित्र आहे.

या परिस्थितीत तातडीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी शेतकऱ्यांना आहे, त्या भावात सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी बाजारात असलेला सोयाबीनचा कमाल चार हजार ५६५ रुपये क्विंटलचा भाव गुरुवारी (ता. ७) चार हजार २९० रुपये क्विंटलवर येऊन थांबला आहे.

सोयाबीनची काढणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. चांगला पाऊस झाल्याने शेतकरी ऊस लागवडीलाही प्राधान्य देत आहेत. रब्बीची पेरणी व ऊस लागवडीचा खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी होताच ते बाजारात विक्रीसाठी आणायला सुरुवात केली आहे. यातूनच दिवाळी पाडव्यानंतर सोमवारी (ता. ४) सोयाबीनची विक्रमी ४९ हजार ११ क्विंटल आवक झाली.

या दिवशी कमाल ४५६५, तर किमान ३९०० रुपये भाव होता. त्यानंतर भावाची घसरण सुरू झाली. त्यानंतर बाजारात सोयाबीनची आवकही कमी होऊ लागली. मंगळवारी (ता. ५) ४८ हजार ५५१ क्विंटल, तर बुधवारी (ता. ६) ४५ हजार ५४० क्विंटल आवक होती. दोन्ही दिवशी सोयाबीनला कमाल ४३५० तर किमान ३९०० रुपये भाव मिळाला.

गुरुवारी (ता. ७) भाव वाढीच्या आशा असतानाच त्यात घसरण होऊन चार हजार २९० कमाल, तर तीन हजार ८३७ भाव मिळाला. गुरुवारी ३४ हजार ९८३ क्विंटल आवक होती. दुसरीकडे जिल्ह्यात १४ केंद्रांवर सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू होऊनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे.

आतापर्यंत पंधरा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात सोयाबीनमध्ये मॉईश्चरचे प्रमाण जास्त असल्याने त्याची केंद्रावर खरेदी होताना दिसत नाही. यामुळे तातडीच्या गरजा भागवण्यासाठी शेतकरी हतबल झाले असून त्यांना बाजारात मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री करण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sachin Ahir: सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडली; शिंदेंच्या सेनेकडून उपसभापतीपदासाठी भरला अर्ज

Agriculture Advisory: मातीचे आरोग्य, कीटकनाशकांच्या संतुलीत वापराबद्दल मार्गदर्शन

Farm Mechanization: यांत्रिकीकरणाची मशागतीला साथ!

Cotton Seed Distribution: ‘कापूस उत्पादकता’अंतर्गत घुसर येथे शेतकऱ्यांना बियाणे वाटप

Farm Road Issue: पहिल्याच पावसात शेतकऱ्यांची वाट बिकट

SCROLL FOR NEXT