Soybean Procurement : श्रीरामपूरमध्ये शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Soybean Rate : महाकिसान संघ राज्यातील नोडल एजन्सी म्हणून जाहीर झाल्यानंतर प्राधान्याने श्रीरामपूर येथे सोयाबीनचे शासकीय खरेदी केंद्र रविवारी (ता. २७) सुरू करण्यात आले आहे.
Soybean Procurement Center
Soybean Procurement CenterAgrowon
Published on
Updated on

Ahilynagar News : महाकिसान संघ राज्यातील नोडल एजन्सी म्हणून जाहीर झाल्यानंतर प्राधान्याने श्रीरामपूर येथे सोयाबीनचे शासकीय खरेदी केंद्र रविवारी (ता. २७) सुरू करण्यात आले आहे.

ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हमीभावानुसार सोयाबीन विक्री करता येणार आहे. सरकारने सोयाबीनला ४८९२ रुपये हमीभाव जाहीर केला आहे.

सध्या मात्र बाजारात चार हजार ते चार हजार चारशे रुपयांपर्यंत सोयाबीन विक्री होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली होती. या अडचणीच्या काळात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून राज्यात हमीभावानुसार सोयाबीन खरेदी सुरू झालेली आहे.

श्रीरामपूर व परिसरातील अडचण लक्षात घेऊन ब्राह्मणी (ता. राहुरी) येथील ग्रीनअप शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून श्रीरामपूर येथे सोयाबीनचे शासकीय खरेदी केंद्र रविवारी (ता. २७) सुरू करण्यात आले आहे.

Soybean Procurement Center
Soybean Market : साताऱ्यातील कोरेगावात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरु

या वेळी ग्रीनअप कंपनीचे चेअरमन अनिल हापसे, ग्रीनअपचे कार्यकारी संचालक सचिन ठुबे, गणेश मुदगुले, मंगेश खरपस, शुभम वाघ, राजेंद्र गवारे, नितीन गवारे, अशोक पवार यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी प्रथम नोंद करणारे शेतकरी म्हणून माळवाडगाव येथील भाऊसाहेब नेमाने या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला, पहिल्याच दिवशी २३० शेतकऱ्यांनी नोंद केल्याची माहिती ग्रीनअपचे व्यवस्थापक किरण कदम यांनी दिली.

Soybean Procurement Center
Soybean Market : अकोल्यात सोयाबीनच्या आवकेत मोठी वाढ

तर शेतकरी हितासाठी महाकीसान संघ सदैव प्रयत्नशील असून आगामी काळात सोयाबीन खरेदीसह कांदा पावडर व इतर अनेक व्यावसायिक उपक्रम सुरू रोजगार निर्मितीला प्राधान्य देणार असल्याची माहिती नोडल संस्था असलेल्या महाकिसान संघाचे चेअरमन प्रशांत लोखंडे यांनी दिली.

शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असून त्यासाठी आधारकार्ड, सोयाबीन नोंद असलेला सात-बारा उतारा, बँक पास बुक घेऊन ग्रीनअप कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे. अप्पासाहेब ढोकने यांनी सूत्रसंचालन केले. तर सचिन ठुबे यांनी प्रस्तावित केले, राजेंद्र गवारे यांनी आभार मानले. माहितीसाठी शेतकऱ्यांनी ग्रीनअप कार्यालय (मो. ८८०५८२१३३२) यांच्याशी संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com