Soybean Procurement : सोयाबीन खरेदी पारदर्शक पद्धतीने व्हावी

Soybean Update : केंद्र शासन यंदा ‘एनसीसीएफ’ व ‘नाफेड’ या दोन केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून सोयाबीनची १३ लाख टन खरेदीचे ६० दिवसांत उद्दिष्ट आहे.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

Nashik News : केंद्र शासन यंदा ‘एनसीसीएफ’ व ‘नाफेड’ या दोन केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून सोयाबीनची १३ लाख टन खरेदीचे ६० दिवसांत उद्दिष्ट आहे. ही खरेदी तत्काळ पूर्ण क्षमतेने व पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी मागणी भाजप किसान मोर्चाच्या वतीने राज्यपालांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र अमृतकर यांनी सांगितले, की राज्याच्या पणन मंडळाने नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, चंद्रपूर, नांदेड या जिल्ह्यांतील केंद्रीय योजनेनुसार शेतीमालाच्या खरेदीचे काम राष्ट्रीय ग्राहक सहकारी मर्यादित (NCCF) या केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाअंतर्गत काम करणाऱ्या संस्थेला दिलेले आहे.

Soybean
Soybean Market : लातूरच्या बाजारात सोयाबीनची विक्रमी आवक

तर उर्वरित जिल्ह्यात ‘नाफेड’ कामकाज करणार आहे. १० ऑक्टोबरपासून खरेदी सुरू झाली आहे. खरेदीसाठी देण्यात आलेला कालावधी ९० दिवसांचा आहे. आजमितीस बारा टक्के ओलावा असलेला सोयाबीन शेतकऱ्यांकडे उपलब्ध नव्हता; मात्र आता तो आता उपलब्ध होऊ लागला आहे.

सोयाबीन खरेदीसाठी शिल्लक असलेल्या ६५ दिवसांत उद्दिष्ठ पूर्ण करायचे असेल तर राज्यातील शेतकऱ्यांकडून रोज ०.२ ते ०.२५ लाख टन सोयाबीन खरेदी होणे अपेक्षित आहे. इतक्या खरेदीसाठी नाफेड आणि एनसीसीएफ या दोघांच्या माध्यमातून एक हजार खरेदी केंद्रांची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात खरेदी केंद्रांची संख्या ४७० च्या जवळपास आहेत.

Soybean
Soybean Market: सोयाबीन उत्पादकांच ऐन दिवाळीत निघतंय दिवाळ; भाव हमीभावापेक्षा ७०० रुपयांनी कमी

नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांतील शेतकरी सोयाबीन खरेदी केंद्रांबाबत संस्थेकडे विचारणा करीत आहेत. मात्र शेतकऱ्यांना आणि विविध शेतकरी उत्पादक संस्था, कृषी सहकारी संस्थांना माहिती देण्यासाठी या जिल्ह्यात किती आणि कोणत्या संस्थेला, कुठे खरेदी केंद्र देण्यात आले आहेत याची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कामकाज व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार दर पाच किलोमीटरवर शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करणारी यंत्रणा असावी. या उद्देशाची अंमलबजावणी खरेदी केंद्राची संख्या दुपटीने वाढविल्यास साधता येणार आहे. सध्याचे ५०० केंद्र १३ लाख टन सोयाबीन खरेदी करू शकणार नाहीत, त्यामुळे खरेदी केंद्रांची संख्या सध्यापेक्षा दुपटीने वाढविणे आवश्यक आहे.

या आहेत मागण्या :

यंदा १२ टक्के ओलावा असलेले नवीन सोयाबीन मिळेपर्यंत आपल्या पॅरामीटरमध्ये बसणारे आणि उपलब्ध असणारे असलेले कोणत्याही प्रकारचे सोयाबीन खरेदी करावे

खरेदी झालेल्या सोयाबीनचे पेमेंट २४ तासांत द्यावे. वखार पावती तत्काळ केंद्रीय खरेदी एजन्सीला मिळणार आहे. त्यामुळे सध्या होत असलेला वेळेचा अपव्यव टळणार आहे

ज्या खरेदी केंद्रांवर शेतीमालाची चोरी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते त्यांना दाद मागण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर करावा.

यंदा १२ टक्के ओलावा असलेले नवीन सोयाबीन मिळेपर्यंत आपल्या पॅरामीटरमध्ये बसणारे आणि उपलब्ध असणारे असलेले कोणत्याही प्रकारचे सोयाबीन खरेदी करावे

खरेदी झालेल्या सोयाबीनचे पेमेंट २४ तासांत द्यावे. वखार पावती तत्काळ केंद्रीय खरेदी एजन्सीला मिळणार आहे. त्यामुळे सध्या होत असलेला वेळेचा अपव्यव टळणार आहे

ज्या खरेदी केंद्रांवर शेतीमालाची चोरी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते त्यांना दाद मागण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर करावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com