Soybean import Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

GM Soybean : देशात जनुकीय परावर्तित सोयाबीनची मोठी खेप दाखल

देशात जनुकीय परावर्तित (जीएम) सोयाबीनला परवानगी नसताना अनधिकृत स्वरूपात मुंबई बंदरावर ते दाखल झाल्याचा खळबळजनक आरोप सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) केला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर : देशात जनुकीय परावर्तित (जीएम) सोयाबीनला (GM Soybean India) परवानगी नसताना अनधिकृत स्वरूपात मुंबई बंदरावर ते दाखल (GM Soybean Import) झाल्याचा खळबळजनक आरोप सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाने (Soybean Processors Association Of India) (सोपा) केला आहे. या शिपमेंटला वेळीच अटकाव न केल्यास देशात पर्यावरणीय धोका निर्माण होऊ शकतो, असाही दावा ‘सोपा’कडून करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारितील प्लांट प्रोटेक्शन आणि क्वारंटाइन खात्याचा प्रभार असलेले संयुक्त सचिव प्रमोद कुमार यांना लिहिलेल्या पत्रातून हा आरोप करण्यात आला आहे. पत्रानुसार, देशात एमव्ही रूबी नामक जहाजाच्या माध्यमातून १७७४१ टन जनुकीय परावर्तित सोयाबीन मागविण्यात आले आहे. मुंबई बंदरावर हे सोयाबीन दाखल झाले आहे. देशात जनुकीय परावर्तित सोयाबीनला बंदी आहे.

अशा स्थितीत हे सोयाबीन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास बियाणे म्हणून त्याचा वापर होऊ शकतो. यातूनच कृषी आणि जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ५ डिसेंबर १९८९ मध्ये या संदर्भात पारित कायद्यातील तरतुदीनुसार जनुकीय परावर्तित बियाण्यांच्या आयातीवर केंद्र सरकारने प्रतिबंध घातले आहेत. त्यामुळे या कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई होण्याची शक्यता पाहता संबंधित आयातदार कंपनीने मूळ दस्तऐवजातच फेरफार केली आहे. ज्या देशातून हे सोयाबीन मागविण्यात आले, त्याऐवजी दुसऱ्याच देशाचे नाव दर्शविण्यात आले आहे. नॉन जी.एम. सोयाबीन आयातीला देशात परवानगी आहे.

आफ्रिकन देशांमधून अशाप्रकारचे सोयाबीन आयात केले जाते. त्याकरिता शून्य आयात शुल्क आहे. मात्र जगाच्या इतर देशांतून सोयाबीन आयात केल्यास त्याकरिता ४५ टक्के आयात शुल्क चुकवावे लागते. ही बाब लक्षात घेता संबंधित आयातदाराने या जहाजाला आफ्रिकेवरून डायव्हर्ट करून त्याचे मूळ ठिकाण बदलले आहे. सोबतच या सोयाबीनला नॉन जीएम घोषित करून कर चोरी करण्याचा प्रयत्न देखील केला आहे.

आफ्रिकन देशांमध्ये सोयाबीनचे नाममात्र उत्पादन होते. त्यामुळे आफ्रिकेतून सोयाबीनची आयात झाली असती, तर ती १००-२०० टना पेक्षा अधिक नसती. परंतु या कंटेनरमध्ये १७७४१ टन सोयाबीन आहे. आफ्रिकेतून इतक्या मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची आयात शक्य नाही. दक्षिण अमेरिकेमध्ये जनुकीय परावर्तित सोयाबीनचे उत्पादन होते. त्याच परिसरातील ब्राझील आणि अर्जेंटिना हे जगातील सर्वांत मोठे सोयाबीन उत्पादक आहेत. याच भागातून हे सोयाबीन आले असावे, अशी शंका देखील ‘सोपा’ने उपस्थित केली आहे.

जनुकीय परावर्तित सोयाबीनची एक मोठी खेप देशात दाखल झाली आहे. यापूर्वी मुद्रा पोर्टलवर अशा प्रकारचे एक जहाज सोयाबीन घेऊन आले होते. त्या वेळी सोपानेच विरोध केल्याने ते त्याच ठिकाणी थांबून ठेवण्यात आले आहे. या वेळी मात्र मुद्रा ऐवजी मुंबई पोर्टवर जीएम सोयाबीन बोलावण्यात आले आहे. अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून जीएम सोयाबीनला नॉन जीएम भासविणे शक्य आहे. त्याकरिता जहाजातील मूळ नमुने न घेता दुसरेच नमुने चाचणीकरिता सादर केले जाण्याची शक्यता आहे. एकदा नमुना प्रमाणित करून घेतला, की मग देशाच्या विविध भागांत हे जीएम सोयाबीन सहज पोहोचविता येणार आहे. आयातदारांचा हा प्रयत्न हाणून पाडण्याकरिता सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.

- डी. एन. पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी,

सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT