देशातील धान्य उत्पादन ३५७.७३ दशलक्ष टनांवरएकूण धान्य उत्पादनात ७.६५ टक्के वाढतेलबिया उत्पादन ८ टक्के वाढून जवळपास ४३ दशलक्ष टनांवर भाताचे विक्रमी १,५०१.८४ लाख टन उत्पादन सोयाबीनचे उत्पादन १५२.६८ लाख टनांवर.Foodgrain Production: भारताने धान्य उत्पादनात नवा इतिहास रचला आहे. गेल्या १० वर्षांत विक्रमी वाढ नोंदवत, उत्पादन २५१.५४ दशलक्ष टनांवरून ३५७.७३ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले आहे. मुख्यतः तेलबिया मिशनला उल्लेखनीय यश मिळाले आहे. २०२३-२४ मधील तुलनेत तेलबिया उत्पादन ८ टक्के वाढून जवळपास ४३ दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. याआधी ते ३९.६७ दशलक्ष टनांवर होते. एकूणच, गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण धान्य उत्पादनात ७.६५ टक्के वाढ झाली आहे..धान्य उत्पादनातील ही वाढ प्रामुख्याने भात उत्पादनात झालेली लक्षणीय वाढ, गहू आणि भरड धान्यांमधील मध्यम वाढीमुळे झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर कडधान्ये उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. .Foodgrain Production: यंदा देशात धान्य उत्पादनात सुधारणा, पण बंपर पीक नाही, कृषी विभागाचा अंदाज काय सांगतो? .केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्ली येथे २०२४-२५ च्या धान्य उत्पादनाबाबतचा अंतिम अंदाज जाहीर केला..एकूण धान्य उत्पादन ३,५७७.३२ लाख मेट्रिक टन म्हणजेच ३५७.७ दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. यात गेल्या वर्षीच्या २०२३-२४ च्या तुलनेत ७.६५ टक्के वाढ दिसून येते..Foodgrain, Vegetable Inflation: धान्य, भाजीपाला महागला; पण शेतकऱ्यांना फायदा होतो का?.भाताचे उत्पादन १,५०१.८४ लाख टन इतके विक्रमी झाले आहे. जे गेल्या वर्षीच्या १,३७८.२५ लाख टनांच्या तुलनेत १२३.५९ लाख टनांनी अधिक आहे. गव्हाच्या उत्पादनातही वाढ झाली आहे. गहू उत्पादन १,१७९.४५ लाख टनांवर पोहोचले आहे. २०२३-२४ वर्षातील १,१३२.९२ लाख टनांच्या तुलनेत २०२४-२५ मधील उत्पादन ४६.५३ लाख टनांनी अधिक आहे..कृषिमंत्री चौहान यांनी कडधान्ये आणि तेलबियांच्या उत्पादनात झालेल्या वाढीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कडधान्यांचे उत्पादन सुमारे ६ टक्के वाढून २५६.८३ लाख टनांवर गेले आहे. यात १४.३७ लाख टनांनी वाढ झालेली दिसते. कडधान्यांमध्ये ४२.४४ लाख टन मूग उत्पादनाचा समावेश आहे..तेलबियांचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ८ टक्के वाढले आहे. सोयाबीनचे उत्पादन १५२.६८ लाख टन झाले आहे. याआधीच्या वर्षात ते १३०.६२ लाख टन होते. भुईमूग उत्पादन १०१.८० लाख टनांवरून ११९.४२ लाख टनांपर्यंत वाढले आहे..मका उत्पादन ३७६.६५ लाख टनांवरून ४३४.०९ लाख टनांवर पोहोचले आहे. तर ऊस उत्पादनात किरकोळ वाढ नोंदवली गेली आहे. ऊस उत्पादन ४,५४६ लाख टन झाले असल्याचे कृषी मंत्रालयाने म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.