Sugarcane  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugarcane : अमरावतीत रसवंतीसाठीच्या उसाच्या आवकेत वाढ

Sugarcane Production : उन्हाळ्यामुळे सध्या उसापासून तयार रसाला मागणी राहते. परिणामी अमरावती बाजार समितीत सध्या छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या विविध भागांतून रसवंतीसाठीच्या उसाची आवक वाढली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : उन्हाळ्यामुळे सध्या उसापासून तयार रसाला मागणी राहते. परिणामी अमरावती बाजार समितीत सध्या छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या विविध भागांतून रसवंतीसाठीच्या उसाची आवक वाढली आहे. दररोज सरासरी ४० टन उसाची आवक होत असल्याची माहिती व्यापारी नौशाद अली यांनी दिली.

रसवंतीसाठी रसाचे प्रमाण अधिक असलेल्या हिरव्या उसाला मागणी राहते. अमरावती बाजार समिती अंतर्गत असलेल्या फळे व भाजीपाला बाजारात सद्यःस्थितीत अशा उसाची आवक होत आहे. या उसाचा सरासरी आठ महिन्याचा हंगाम राहतो.

उन्हाळ्याच्या दिवसात पौष्टिक पेय म्हणून उसाच्या रसाला सर्वदूर मागणी राहते. परिणामी, या काळात या उसाची आवक ५५ ते ६० टनापर्यंत होते. आता पावसाळा तोंडावर आला आहे.

पावसाळ्यात उसाच्या रसालाही मागणी राहत नाही. परिणामी, राज्यातून होणारी उसाची आवक देखील टप्प्याटप्प्याने कमी होते, असे नौशाद अली यांनी सांगितले.

क्‍विंटलला ६०० ते ८०० रुपये दर

सध्या या उसाला ६०० ते ८०० रुपये क्‍विंटल असा दर मिळत आहे. ७० ते ९० रुपये किलोने याची विक्री केली जाते. बाजारात आवक कमी झाल्यास दरात तेजी येते. मात्र सध्या तरी आवक कमी होण्याची कोणतीच शक्‍यता नाही. परिणामी यापुढील काळात दर स्थिर राहतील, असे नौशाद यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Dung : गाईचे शेण १ रुपया किलोने खरेदी करणार; एनडीडीबीचा महाराष्ट्रासह ६ राज्यांत उपक्रम

Marathwada Heavy Rain: मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच

Ginger Farming: आले पिकाचे निरीक्षण करून रासायनिक फवारणीवर भर

Plant Nutrition: पीक वाढीसाठी बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन

Agriculture Productivity Growth: उत्पादकता वाढ सर्वांच्याच हिताची

SCROLL FOR NEXT