Sugarcane Season : अंदाजापेक्षाही १३१ लाख टन जादा उसाचे गाळप

Sugarcane Crushing : राज्याचा ऊस गाळप हंगाम कमी साखर निर्मिती लवकर संपेल, असा आधी जाहीर केलेला अंदाज यंदा साफ चुकला आहे.
Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing SeasonAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्याचा ऊस गाळप हंगाम कमी साखर निर्मिती लवकर संपेल, असा आधी जाहीर केलेला अंदाज यंदा साफ चुकला आहे. अंदाजापेक्षाही यंदा १३१ लाख टन जादा ऊस गाळला गेला. तसेच हंगामदेखील १२० दिवसांच्या पुढे चालविण्यात साखर उद्योगाला यश मिळाले.

‘‘सुरुवातीच्या अंदाजानुसार यंदा ९४० लाख टन गाळप व ८८ लाख टन साखर तयार होण्याची शक्यता गृहीत धरली होती. तसेच १५ लाख टन साखर इथेनॉलकडे वळेल, असे अपेक्षित होते.

एकूण गाळप हंगाम ८०-९० दिवसांच्या पुढे जाणार नाही, असेही जाणवत होते. परंतु अंदाजापेक्षाही यंदा जास्त गाळप झाले. अवकाळी पावसामुळे उसाचे झालेले उत्तम पोषण व वाढलेल्या उत्पादकतेमुळे हे घडले आहे ,’’ असे साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Bills : शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही, पांटबंधारे विभागाची वसुलीसाठी कसरत

यंदाचे एकूण गाळप १०७१ लाख टनांच्या पुढे गेले आहे. साखर उत्पादनदेखील १०९ लाख टनांहून अधिक झाले आहे. दुष्काळी स्थितीत देखील साखरेचा सरासरी उतारा १०.२६ पर्यंत राखण्यात कारखान्यांना यश मिळाले आहे.

आतापर्यंत २०५ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहे. सध्या केवळ दोन कारखाने चालू आहेत. त्यांची गाळप व साखर निर्मिती क्षमता मोठी नाही. त्यामुळे गाळप व साखर निर्मितीच्या आकडेवारीत यापुढे मोठी वाढ होण्याचा मुद्दा आता निकालात निघाला आहे.

चालू हंगामात १०३ सहकारी व १०४ खासगी अशा २०७ साखर कारखान्यांनी यंदा ऊस खरेदी केली. प्रत्यक्ष गाळप एक नोव्हेंबरपासून सुरू झाले. गाळपाचे दिवस सरासरी १२० ते १२२ राहिले आहेत. गेल्या २०२२-२३ मधील हंगामात गाळपाला १०६ सहकारी व १०५ खासगी, असे एकूण २११ साखर कारखाने गाळपात उतरले होते. त्यांनी १०५९ लाख टन ऊस खरेदी करीत १०५.२३ लाख टन साखर तयार केली होती.

Sugarcane Crushing Season
Sugarcane FRP : राज्यातील साखर कारखान्यांनी थकवले शेतकऱ्यांचे ८५७ कोटी रुपये!

‘‘अंदाजाप्रमाणे यंदा १५ लाख टन साखर इथेनॉलकडे वळती झालेली नाही. केंद्र शासनाच्या निर्बंधामुळे केवळ पावणेसहा लाख टन साखर इथेनॉलकडे वळविणे शक्य झाले. त्यामुळे राज्यात अतिरिक्त साखर व कमी इथेनॉलची समस्या दिसते आहे.

दुसऱ्या बाजूला यंदा उसाची उत्पादकता हेक्टरी ७२ ऐवजी ८४ हेक्टरपर्यंत गेली. परिणामी, अंदाजापेक्षाही चांगले गाळप राज्यात झाले. परंतु साखर कारखान्यांच्या चांगल्या नियोजनामुळे शिल्लक उसाची समस्या कुठेही तयार झाली नाही,’’ असे आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

साखर आयुक्त आढावा घेणार

साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार सध्या राज्याबाहेर आहेत. ते ओरिसातील पुरी लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक म्हणून दौऱ्यावर आहेत. ओडिशातून २६ मेनंतर ते परतण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऊस गाळप हंगामाचा व एफआरपी वाटपाचा अंतिम आढावा आयुक्तांकडून घेतला जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com