डॉ. गणेश निटुरेशीतलहरीमुळे पशुधनाची ऊर्जा कमी होऊन शरीराचे तापमान कमी होते. थंडीत पशूंना उबदार निवारा, पिण्यास कोमट पाणी आणि पौष्टिक आहार देणे आवश्यक आहे. हे उपाय केल्यास पशुधनाचे आरोग्य सुरक्षित राहते. उत्पादनामध्ये सातत्य राहते..थंड हवेमुळे पशुधनावर गंभीर परिणाम होतात.विशेषतः हायपोथर्मिया (शरीर अतिथंड होणे), फ्रॉस्टबाईट (त्वचेचे नुकसान), श्वसनविकार, भूक मंदावणे यांसारखे आजार वाढतात. नवजात वासरे, दुभत्या गाई-म्हशी, मेंढी-शेळ्या आणि अशक्त जनावरे यांना सर्वाधिक धोका असतो. दूध उत्पादन २० ते ३० टक्के घटू शकते किंवा मृत्युदर वाढतो. थंडीत पशूंना उबदार निवारा, पिण्यास कोमट पाणी आणि पौष्टिक आहार देणे अत्यावश्यक आहे. हे उपाय केल्यास पशुधन सुरक्षित राहते आणि पशुपालकांचे आर्थिक नुकसान कमी होते. शीतलहरीमुळे पशुधनाची ऊर्जा कमी होऊन शरीराचे तापमान कमी होते..Winter Livestock Care: थंडीमध्ये जनावरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? .नवजात वासरे/करडे : शरीर तापमान नियंत्रण कमकुवत असते; थंडीमुळे हायपोथर्मिया (शरीर अतिथंड होणे) होऊन मृत्यू होऊ शकतो.दुभती गाय-म्हैस : शारीरिक तापमान राखण्यासाठी ऊर्जेचा जास्त खर्च होतो, दूध उत्पादन घटते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते.मेंढी-शेळ्या (विशेषतः करडे) : रानात स्थलांतरित कळपांना थंड वाऱ्याचा थेट धक्का बसतो; लोकर कापल्यास त्याचा धोका दुप्पट.आजारी/अशक्त जनावरे : श्वसनविकार किंवा जुनाट आजार असलेल्यांना श्वास घेणे कठीण होते.कोंबड्या, श्वान : खोकला आणि श्वसन समस्या वाढतात. या गटांमध्ये मृत्युदर १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो..उपाययोजनागोठे चारही बाजूंनी बंदिस्त करावेत. गरम कापड, बारदान किंवा प्लॅस्टिक पडदे लावावेत. छतावर वाळलेले गवत/तुरट्यांचा १-२ फूट थर द्यावा. हिवाळ्यात सूर्यप्रकाश आत येईल अशी व्यवस्था करावी. गोठ्यात हवा कोंडणार नाही याची दक्षता घ्यावी. जमिनीवर ६ ते ८ इंच जाड वाळलेला चारा किंवा पेंढ्या पसराव्यात.अतिथंड रात्री (तापमान ५ अंश सेल्सिअस खाली) कृत्रिम प्रकाश किंवा सुरक्षित हीटर/शेकोटी वापरा, पण धूर गोठ्यात जाऊ देऊ नका..Livestock Care: जनावरांतील ‘ॲस्पिरेशन न्यूमोनिया’ची लक्षणे अन् उपाय.मेंढी-शेळ्या उबदार शेडमध्ये राहतील याची काळजी घ्यावे. तसेच लोकर कापणी टाळावे.नवजात/अशक्त पिल्लांना जुने कापड, बारदाने झाकावे. रात्री सर्वांना उबदार पांघरूण द्यावे.कोंबड्यांच्या शेडमध्ये तापमान २०-२५ अंश सेल्सिअस राखण्यासाठी बल्ब किंवा ब्रूडर वापरावे.जनावरांना तेलयुक्त पेंढी, गूळ मिश्रित खाद्य, हिरवा चारा द्यावा. वासरांना गूळ-पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट मिश्रण यांचा वापर करावा.Monsoon Livestock Care: पावसाळ्यात जनावरांचा आजारांचा धोका; कशी घ्यायची काळजी?.दुधाळ गाई-म्हशींना चरबीयुक्त पूरक (तेलयुक्त पशूखाद्य) आणि मिठाचे प्रमाण वाढवावे. गाभण जनावरांना (६ महिने पेक्षा अधिक) २०-३० टक्के अतिरिक्त खाद्य देणे आवश्यक आहे. दिवसातून ४-५ वेळा कोमट पाणी (३०-३५ अंश सेल्सिअस) द्यावे; पिण्यासाठी थंड पाणी टाळल्याने भूक आणि दूध वाढते.मेंढी-शेळीच्या आहारात कर्बोदके जास्त द्या, पण अचानक त्याचे प्रमाण वाढवू नका. अन्यथा, पित्ताचे प्रमाण वाढू शकते..रोज गोठा रोज स्वच्छ आणि कोरडा ठेवा. बाह्य परजीवी (गोचीड, गोमाशा) रोखण्यासाठी निरगुडी, तुळस किंवा कडूलिंब तेलाच्या जुड्या गोठ्यात टांगाव्यात.शेण आणि मलमूत्राची विल्हेवाट लावण्यासाठी गोठ्यापासून लांब खड्डा तयार करावा. जेणेकरून परोपजीवींची संख्या नियंत्रणात राखण्यास मदत होईल.लाळ्या-खुरकूत, घटसर्प, पीपीआर, आंत्रविषार, फऱ्या नियंत्रणासाठी लसीकरण करावे.आवश्यकतेनुसार जंतनाशक औषधे पाजावे.शेकोटी करताना धूर गोठ्याबाहेर काढावा, कारण ओलावा आणि धूर श्वसनविकार वाढवतात.- डॉ. गणेश निटुरे ९९७०१२३२२०(पशुधन विकास अधिकारी, तालुका लघू पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, रेणापूर, जि. लातूर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.