Tomato  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tomato Market : टोमॅटोची लाली खुलली

मुकूंद पिंगळे

Nashik News : आवक निम्म्यावर आल्याने टोमॅटो दरात पुन्हा सुधारणा झाली आहे. गत महिन्यात १०० ते १५० रुपये प्रतिक्रेट दर होता. तर आता प्रतिक्रेट ३०० ते ५०० रुपयांदरम्यान दर मिळत असल्याने टोमॅटोची लाली पुन्हा खुलली आहे.

खरीप लागवडीमध्ये मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने टोमॅटो उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले. तर मागील महिन्यात टोमॅटो तोडण्यास महाग झाल्याने सर्वत्र शिवारात लाल चिखल झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवडीकडे लक्ष दिले नाही.

चालू महिन्यात आता उत्पादन घटल्याने आवकेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या दुसऱ्या सप्ताहापासून दरात सुधारणा दिसून आली आहे. मागील काही महिन्यांत परराज्यात स्थानिक आवक सुरू झाली. तसेच केंद्र शासनाने नेपाळमधून टोमॅटो आयातीचे धोरण राबविल्याने बाजारपेठ प्रभावित झाली होती. त्यामुळे टोमॅटो उत्पादन खर्च दूरवरचा वाहतूक परवडत नव्हती.

प्रतिकिलो २ ते ५ रुपये दर मिळत होता. जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक ३ लाख क्रेटवर गेली होती. मात्र आता आवकेत घट आली आहे. नोव्हेंबरच्या सुरवातीला ही आवक दीड लाखांवर होती तर आता ती ६० हजार क्रेटपेक्षा कमी होत आहे. येथे २.५ ते ३ कोटी रुपयांची उलाढाल होत आहे.

... अशी आहे स्थिती

देशांतर्गत राज्याबरोबरच दुबईसह आखाती देशात मागणी

दक्षिण भारतातील बंगलोर परिसरातील टोमॅटोची आवक मंदावली; गुजरातमधूनही आवक कमी

देशांतर्गत दिल्ली, हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये मागणी

बाजार आवक (क्विंटल) किमान कमाल सरासरी (रुपये)

पिंपळगाव बसवंत ११,४०४ ३५० ३,७५५ २,६५५

नाशिक ८५० २,५०० ३,५०० ३,०००

जुन्नर-नारायणगाव ७११ १,००० ३,००० २,०००

मुंबई १,५८६ २,५०० ३,५०० ३,०००

पुणे २,३५४ १,००० ३,००० २,०००

मागील महिन्यात लागवडी उपटून टाकण्याची वेळ आली. मात्र लागवडी टिकवून ठेवल्याचा फायदा झाला. सध्या मागणी असल्याने क्रेटमागे दुप्पट परतावा मिळत आहे.
- ज्ञानेश्वर मुठाळ, शेतकरी, वडगाव पिंगळा, जि. नाशिक
मंदी आल्याने शेतकऱ्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे लागवडी खराब झाल्या. परिणामी चालू महिन्यात उत्पादन घटल्याने आवक मंदावली. त्यामुळे दरात तेजी आहे. देशात मागणी असल्याने शेतकऱ्यांना लाभ होत आहे.
- महेंद्र शिंदे, आडतदर, पिंपळगाव बसवंत बाजार समिती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT