Washim News: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची अंमलबजावणी निश्चित वेळेत, निकषांनुसार आणि समन्वयातून झाली तर जिल्ह्यात हवामान सक्षम, शाश्वत शेती उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित साध्य होईल. गावपातळीवरील जनजागृती वाढवून, अर्ज प्रक्रिया गतिमान करून आणि सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम केल्यास अपेक्षित परिणाम मिळतील. यासाठी प्रकल्पाच्या कामांना गती द्या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले..जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पातर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी श्री.. कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या वेळी ते बोलत होते..Krishi Vigyan Kendra: कृषी विज्ञान केंद्राच्या सल्ल्याने शेती करणे फायद्याचे; तुबाकले.बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, कृषी उपसंचालक हिना शेख, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, मुख्यमंत्री फेलो संकेत नरुटे तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पातील प्रगती, उद्दिष्टे आणि आव्हाने या बाबतचे सविस्तर सादरीकरण संतोष वाळके यांनी केले..Yashwantrao Krishi Mahotsav: राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सवाला प्रतिसाद.पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणी लक्षात घेता टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील १८९ गावांची निवड करण्यात आली आहे. बैठकीदरम्यान प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे पुन्हा अधोरेखित करण्यात आली. शेतीची उत्पादकता व शाश्वतता वाढविणे, पाण्याचा कार्यक्षम व तंत्रज्ञानाधारित वापर, जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी संवर्धित शेती पद्धतींचा अवलंब हे सर्व उद्दिष्टे हवामान बदलाचा वेगाने वाढणारा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी असून प्रकल्पाची दिशा - शाश्वत, आधुनिक आणि हवामान सक्षम शेतीकडे वाटचाल व्हावी, असेही जिल्हाधिकारी या वेळी म्हणाले..कृषिताईंची नेमणूक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळा, सूक्ष्म नियोजन प्रक्रियेचे वेळापत्रक, अर्ज मंजुरी व प्रक्रियेची गती या बाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी तपशीलवार चर्चा केली. प्रकल्पाच्या अंमलबजावणीला अधिक वेग देण्यासाठी श्री. कुंभेजकर यांनी सर्व आराखडे वेळेत आणि निश्चित मर्यादेत सादर करणे, गावपातळीवरील जनजागृती मोहीम अधिक व्यापक व प्रभावी करणे, अर्ज संख्येत वाढ व्हावी यासाठी अधिक सक्रिय काम, तालुकास्तरीय अधिकारी लॉगिनवरील अर्ज वेळेत जिल्हास्तरीय समितीकडे फॉरवर्ड करतील याचे पालन, नॉर्म्स प्रमाणे प्रकल्पाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे निर्देश दिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.