sandeep Shirguppe
टोमॅटो हे अत्यंत रसरशीत फळ म्हणून ओळखले जाते. यामुळे टोमॅटो खाण्याचे अत्यंत चांगले फायदे आहेत. तसेच रोजच्या जेवणातही टोमॅटोचा वापर केला जातो.
टोमॅटो खाणं जास्तीत जास्त लोकांना आवडते कारण टेस्टला चांगले आणि आरोग्याला फायदेही अनेक होतात.
टोमॅटोमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते. त्यामुळे हे खाल्ल्याने इम्यूनिटी मजबूत होते. तसेच शरिरात पाण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
तुम्ही टोमॅटोचे अधिक सेवन केले तर तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यताही आहे. आतापर्यंत तुम्हाला फक्त टोमॅटोचे फायदे माहीत असतील, आता टोमॅटोचे नुकसान जाणून घेऊ.
टोमॅटो अधिक प्रमाणात खाल्ल्यास अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. कारण यात अॅसिडिक प्रमाण जास्त असतं.
तुम्हाला अॅसिडिटी, गॅसची समस्या असेल अशा लोकांनी टोमॅटोचं सेवन करू नये किंवा कमी करावं.
टोमॅटोमुळे किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. याचं कारण टोमॅटोच्या बीया सहजपणे किडनीमध्ये पोहोचून स्टोन बनवण्याचे काम करण्यास मदत करतात.
टोमॅटोचं अधिक सेवन केल्याने छातीत जळजळ होण्याची समस्या अधिक होते. कारण यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.
जास्त टोमॅटो खाल तर शरीरातून दुर्गंधी येण्याची समस्या वाढते. कारण टोमॅटोमध्ये टरपीन्स नावाचे तत्व आढळते. ज्याने शरीरातून दुर्गंधी येण्याची समस्या वाढते.
टोमॅटोमध्ये सोलनिन नावाचं अल्कलॉइड असतं, जे जॉइंट्समध्ये सूज येण्याचं कारण ठरतं. ज्यामुळे जॉइंट्समध्ये वेदना होतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.