बीड : जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी तसेच रब्बी पेरणीसाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या अनुदानाचे वितरण वेगाने सुरू आहे. आतापर्यंत तब्बल ९८४ कोटी ४९ लाख रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे..जून ते सप्टेंबर २०२५ या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि महापुराने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. दीड हजारांवर विहिरी बुजल्या, तर हजारो हेक्टर जमीन मातीसह खरडून गेली. .Ativrushti Madat: अतिवृष्टी, महापूर नुकसानीचे ४०९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.शासनाने जिल्ह्यास १४१० कोटी १२ लाखांचे दोन टप्प्यांतील अनुदान मंजूर केले आहे. त्यापैकी पीक नुकसान अनुदानासाठी ७०२ कोटी ४ लाख तर रब्बी पेरणी अनुदानासाठी ७०८ कोटी ८ लाख रुपये अशी तरतूद केली आहे..Flood Compensation: अतिवृष्टी अनुदानाच्या केवळ ४६ टक्के याद्या अपलोड.जिल्ह्यातील १४,८०,६३९ शेतकऱ्यांची माहिती पंचनामा पेमेंट पोर्टलवर दाखल झाली असून त्यापैकी पीक नुकसान झालेल्या ६,८५,५४९ शेतकऱ्यांच्या खात्यात ४४०.५१ कोटी रुपये, रब्बी पेरणीसाठी पात्र ६,४६,३१६ शेतकऱ्यांच्या खात्यात ५०७.९८ कोटी रुपये अशाप्रकारे एकूण ९४८.४९ कोटी रुपये थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत..ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनीही सीएससी किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क करून नोंदणी पूर्ण करावी. अनुदान प्रक्रियेत प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत मदत जलदगतीने पोहोचावी, यासाठी विशेष पथकेही कार्यरत आहेत. अजूनही १,०४,३३१ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित असून, त्यांनी केंद्रात जाऊन ती पूर्ण करावी.- विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.