Chana and Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Soybean Rate: अकोल्यात हरभरा ५५००, सोयाबीन ४२५० रुपये क्विंटल

Akola Market Update: स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून शेतीमालाची आवक व दरांमध्ये स्थिरता दिसून येत आहे.

 गोपाल हागे

Akola News: स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून शेतीमालाची आवक व दरांमध्ये स्थिरता दिसून येत आहे.

खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने शेतकरी आपला शिल्लक शेतीमाल बाजारात विक्रीस आणत असून, सध्या हरभरा सरासरी ५५०० रुपये प्रति क्विंटल तर सोयाबीन ४२५० रुपयांपर्यंत विकले जात आहे. तुरीचा दरही तुलनेत स्थिर आहे.

शेतकऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी शेती मशागतीसाठी भांडवल उभारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे साठवलेला हरभरा, तूर, सोयाबीन विक्रीस आणून शेतकरी आर्थिक तजवीज करू लागले. बाजार समितीच्या नोंदींनुसार, सोमवारी (ता. ९) सोयाबीन सरासरी ४२५० रुपये क्विंटल विकत आहे.

बाजारात १२१५ क्विंटलची आवक झाली होती. सोयाबीन किमान ४१०० व कमाल ४३३५ पर्यंत विकते आहे. हरभऱ्याचा दर किमान ५००० व कमाल ५६२० रुपये दराने विक्री झाला. १२३५ क्विंटल आवक होती.

तुरीच्या दरात विशेष चढउतार नसून सरासरी ६७३० रुपयांचा दर मिळतो आहे. मात्र, तुरीची सध्याची आवक तुलनेत कमी असून, काही शेतकरी अधिक दराच्या अपेक्षेने तूर साठवून ठेवत असल्याचे दिसून येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT