Agrowon Podcast : हरभऱ्याचा भावात पुन्हा वाढ; कापूस, सोयाबीन, केळी तसेच काय आहेत गहू दर?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, केळी, हरभरा आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture Market Agrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीन काहीसे सुधारले

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव आज वाढला होता. सोयाबीनचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत १०.०५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. सोयाबीनचा भाव आपल्या निचांकी पातळीवरून मागच्या १० दिवसांममध्ये सुधारला आहे. आज सोयातेलाचे वायदे ४१.३३ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर सोयापेंडचे वायदे ३१५ डाॅलर प्रतिटनांपर्यंत वाढले होते. देशात सोयाबीनला ४ हजार ते ४ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव आजही ४६०० ते ४७५० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसामध्ये चढ उतार

देशात आज कापसाच्या भावात काहीशी वाढ झाली होती. तर आंतराष्ट्रीय बाजारात काहीसे चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ६९.८४ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५८ हजार ७०० रुपये प्रतिखंडी होते. बाजार समित्यांमध्ये मात्र भाव स्थिर आहेत. बाजार समित्यांमध्ये कापसाला आजही ६ हजार ९०० रुपये ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Agrowon Podcast : टोमॅटोच्या भावात नरमाई; कापूस, सोयाबीन, टोमॅटो तसेच काय आहेत आले दर

केळीला उठाव कायम 

बाजारात सध्या केळीचा उठाव कायम आहे. केळीला गेले महिनाभर श्रावण उपवासामुळे मागणी टिकून होती. तर पुढे गणेशोत्सव आणि नवरात्री या काळातही चांगली मागणी राहण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे केळीचा पुरवठा मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. परिणामी केळीला सध्या १ हजार ८०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. केळीचा पुरवठा पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे केळीचे भावही टिकून राहतील, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Chana Rate : हरभऱ्याच्या दरात शंभर ते दोनशे रुपये चढउतार

गव्हाच्या भावात काहीशी वाढ

गव्हाला सणांमुळे मागणी वाढली आहे. सणांची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी गव्हाची खरेदी करत आहेत. पण सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत गव्हाचा पुरवठा कमी दिसतो. त्यातच सरकारची गहू विक्रीही कमी झाली आहे. यामुळे गव्हाचे भाव गेल्या आठवडाभरात काहीसे वाढलेले दिसत आहेत. गव्हाचा भाव मागील काही दिवसांपासून १०० ते १५० रुपयांनी वाढला आहे. सध्या गव्हाचा प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ६०० ते ३ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील गव्हाची मागणी आणि पुरवठा लक्षात घेता गव्हाच्या भावातील सुधारणा कायम राहील, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.    

हरभऱ्यातील तेजी वाढली

हरभऱ्याच्या भावातील तेजी मागील दोन दिवसांमध्ये पुन्हा वाढली. हरभऱ्याचा भाव दिल्ली आणि जयपूर सारख्या बाजारात ८ हजारांवर पोचला. सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण स्टाॅकिस्ट त्या प्रमाणात बाजारात हरभरा आणत नाहीत. परिणामी हरभऱ्याच्या भावात सुधारणा झाली आहे. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पण दुसरीकडे वाढलेल्या भावात मागणी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच आयात मालही येत आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढ उतार राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com