Sugar Factory FRP : सोलापूर गोकुळ सहकारी साखर कारखान्याकडील सन २०२३, २०२४ आणि २०२४-२५ या तीन गळीत हंगामांतील थकीत ऊस बिले तातडीने अदा करावीत, या प्रमुख मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी संघटना, गोकुळ थकीत ऊस बिल संघर्ष समिती आणि अक्कलकोट शेतकरी बांधव यांच्या वतीने १० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या दिवशी दुपारी १२ वाजता सोलापूरातील चार हुतात्मा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. .संघटनांनी दिलेल्या निवेदनानुसार, गोकूळ सहकारी साखर कारखान्याने सुमारे ७० गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तीन वर्षांपासूनची ऊस बिले अद्याप अदा केलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली असून, त्यांच्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत..Farmer Payment Crisis: ऊसबिले थकबाकीत तब्बल ३२ पट वाढ.ऊसदर नियंत्रण आदेशानुसार ऊस खरेदीनंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर बिलाची रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, कारखान्याकडून या नियमाची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप संघटनांनी केला आहे..Gokul Sugar News: ‘गोकुळ शुगर’कडून शेतकऱ्यांना ऊसबिलाच्या धनादेशाचे वाटप .संघटनांच्या म्हणण्यानुसार, सन २०२४-२५ गळीत हंगामातील सुमारे ५० कोटी रुपये ऊस बिलाची रक्कम अदा करण्यात आली असली, तरी मागील तीन हंगामांतील संपूर्ण थकीत रक्कम अद्यापही बाकी आहे..थकीत ऊस बिले तातडीने अदा न झाल्यास यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.