Unseasonal Rain Compensation: राज्यात मे २०२६ मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील सहा जिल्ह्यांतील ८ हजार शेतकऱ्यांना ५ कोटी ५४ लाख ३४ हजार रुपये इतकी मदत वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन आदेश मदत व पुनर्वसन विभागाने जारी केला आहे..मे महिन्यात नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांत वादळी वारे आणि अवकाळी पावसाने शेतपिकांचे नुकसान झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गारपीटही झाली होती. यामुळे सोलर पॅनेलचे नुकसान झाले होते. .Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी.मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने नागपूर विभागातील गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील ६,८५० शेतकऱ्यांच्या २,३१९ हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले होते. तर छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यातील १,१८७ शेतकऱ्यांचे ७२६ हेक्टरवरील शेतपिकांना फटका बसला होता. एकूण सहा जिल्ह्यांतील ८,०३७ शेतकऱ्यांचे ३,०४६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले होते. .Crop Damage Compensation: राज्यातील २१ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, ८४ कोटी २३ लाख मदत मंजूर.येथील दोन्ही विभागीय आयुक्तांनी अवकाळी पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शासनाने मदत वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे..हा निधी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पोर्टलद्वारे बाधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.