Kabuli Chana Rate: काबुली हरभऱ्याचे दर टिकून, शेतकऱ्यांना दिलासा

Market Update: खानदेशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन तुलनात्मक कमी असले, तरी बाजारात दर टिकून आहेत. सध्या ११ ते ११,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय.
Kabuli Chana
Kabuli ChanaAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News: खानदेशात मोठ्या काबुली हरभऱ्याचे उत्पादन यंदा बऱ्यापैकी आले आहे. उत्पादन एकरी सहा ते सात क्विंटल एवढे हाती आले होते. दर यंदा कमी-अधिक झाले. सध्या आवक अल्प किंवा काही बाजारांतच होत असून, किमान दर ११ हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक आहेत.

मोठ्या काबुली (डॉलर किंवा मॅक्सिकन) हरभऱ्याची पेरणी जळगाव जिल्ह्यात अधिक म्हणजेच पाच हजार हेक्टरवर केली जाते. ही पेरणी चोपडा, यावल, रावेर भागांत अधिक असते. उत्पादन यंदा बऱ्यापैकी हाती आले होते. अन्य हरभऱ्याच्या तुलनेत काबुलीची मळणी उशिरा म्हणजेच मार्चमध्ये सुरू झाली होती. एकरी सहा ते सात क्विंटल एवढे उत्पादन मिळाले होते. या हरभऱ्याचे २०१९ मध्ये सर्वाधिक एकरी आठ ते नऊ क्विंटल एवढे उत्पादन मिळाले होते.

Kabuli Chana
Chana Processing Industry : उसाच्या पट्ट्यात युवकाचा हरभराडाळ निर्मिती उद्योग

मध्यंतरीदेखील उत्पादन एकरी कमाल आठ क्विंटल एवढे राहिले आहे. यंदा मात्र उत्पादन कमी आले होते. याचे कारण म्हणजे थंडीचे दिवस कमी व ढगाळ वातावरण अधिक होते. नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीनही महिन्यांत सलग दोन दिवस किमान तापमान पाच अंश सेल्सिअसखाली गेले नाही. तसेच या तीनही महिन्यांमध्ये पाऊस आला. १५ ते २० दिवस ढगाळ वातावरण असायचे.

हरभरा पिकाला सलग थंडी हवी असते. परंतु प्रतिकूल वातावरण राहिले. मध्यम जमिनीत काबुली हरभरा पीक अधिक असते. त्याची पेरणी चोपड्यातील अनेर व तापी नदीकाठी अधिक केली जाते. या भागात सिंचन अनेकदा करावे लागते. काबुली हरभऱ्याचे दर एप्रिल अखेरीस कमी अधिक झाले. परंतु एप्रिल अखेरपासून दर टिकून आहेत. सध्या प्रतिक्विंटल किमान ११,००० रुपये एवढा दर आहे. तर काही शेतकऱ्यांना ११,५०० रुपये प्रतिक्विंटलचा दरही मिळाला आहे.

Kabuli Chana
Chana Rate Today: हरभरा, मसूरचा भाव हमीभावापेक्षा कमी; गव्हाला दोन महिन्यांपासून अधिक दर

गेल्या वर्षी प्रतिक्विंटल नऊ ते १० हजार रुपये व सरासरी साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. पण यंदा दर बरे राहिले. एप्रिलनंतर दरवाढ होईल, अशी अपेक्षा काबुली हरभरा उत्पादकांना होती. एप्रिल अखेरपर्यंत अनेकांनी विक्री टाळली. परंतु फारसा साठा काबुली हरभऱ्याचा शेतकऱ्यांकडे सध्या नाही.

या हरभऱ्यासाठी जळगाव जिल्ह्यात चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर येथील बाजार प्रसिद्ध आहे. या बाजारात दर स्थिर आहेत. परंतु काही शेतकऱ्यांना या दरांचा लाभ मिळत आहे. काबुली हरभऱ्यास मध्य प्रदेशातील इंदूर, गुजरातमधील बडोदा, सुरत, अहमदाबाद येथून मागणी आहे. तेथील मोठे खरेदीदार शिरपूर, चोपडा येथील बाजारात संपर्क साधून या हरभऱ्याचा पुरवठा करून घेत आहेत.

नंदुरबारला ३०० क्विंटल आवक

आवक सतत कमी होत आहे. सध्या धुळ्यातील शिरपूर, जळगावातील चोपडा, अमळनेर, नंदुरबारातील नंदुरबार येथील बाजारात प्रतिदिन सरासरी ३०० क्विंटल काबुली हरभऱ्याची आवक होत आहे. काही बाजारांत आवकच नसते. आवकही आठवड्यातून दोन-तीन दिवस असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com