Gold Rate
Gold Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Gold Rate : सोने दर ५६ हजार ३०० रुपये प्रतितोळा

Team Agrowon

Gold Market जळगाव ः काही दिवसांपासून सोने-चांदीच्या (Gold Silver Rate) दरात घसरण दिसत होती. पण मागील दोन दिवसांत सोन्याच्या किमतीत (Gold Rate) एक तोळ्यामागे १३०० रुपयांची वाढ झाली असून, सोने दर (२४ कॅरेट) ५६ हजार ३०० रुपये प्रतितोळा असे वधारले आहेत.

जळगावची सुवर्णनगरी सोन्याची शुद्धता, विविध डिझाइन, सचोटी, वैविध्य यासाठी प्रसिद्ध आहे. सराफ बाजारात मोठी उलाढाल होते. सोने दर मध्यंतरी कमी झाले होते. पण दोन दिवसांत दरात मोठी वाढ झाली आहे.

सोबतच चांदी दरदेखील एक किलोमागे तब्बल एक हजार रुपयांनी वाधरले आहेत. सोन्याचा दर गुरुवारी (ता. ९) प्रतितोळा दर ५५ हजार ३०० रुपये होता. चांदीचा दर प्रतिकिलोचा ६४ हजार रुपयांवर गेला आहे. यापूर्वी चांदीचा दर प्रतिकिलोचा ६३ हजार रुपये असा होता.

गेल्या महिन्यात म्हणजेच २ फेब्रुवारीला सोन्याचे दर प्रतितोळा ५८ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यात हळूहळू घसरण झाली. सोने-चांदीत दरात घसरण झाली, पण त्यात आता काहीशी सुधारणाही दिसत आहे. मौल्यवान धातूंचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जळगाव शहरातील सराफ बाजारात होळीच्या दिवशी (ता. ६) २२ कॅरेट सोन्याचे दर ५१९०० रुपये प्रतितोळा होते. तर २४ कॅरेट सोन्याचे दर अंदाजे ५६ हजार ५५० रुपये प्रतितोळा होते.

सध्या सोन्याचा दर ५५ हजार ७०० रुपये प्रतितोळ्यापर्यंत आहे. मागील आठवड्यात म्हणजेच सोमवारी (ता. ६) चांदीचा दर ६६ हजार ७०० रुपये प्रतिकिलो होता. मागील आठवड्याच्या अखेरीस चांदीचा दर ६२ हजार ३०० रुपयांपर्यंत खाली आला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Farming : शेवडीची दुष्काळावर मात द्राक्षात तयार केली ओळख

Smart Meters : ‘स्मार्ट मीटर्स’चा बोजा ग्राहकांच्या खांद्यावरच

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्याला वळवाचा तडाखा, पूर्व, दक्षिण भागात जोरदार पाऊस

Green Hydrogen : दिशा ‘हायड्रोजन हब’ची

Heavy Rain : पावसामुळे पाईट येथे घरे, पॉलिहाउसला फटका

SCROLL FOR NEXT