Beed News: पंजाब व हरियाना येथील लोकांनी रसायन जमिनीत टाकून माती जाळून टाकली. मातीला आपण माता म्हणतो, मात्र तिला जिवंत ठेवण्याचे उपाय सोडून सर्वत्र प्रदूषणच प्रदूषण सोडत आहोत. खरोखरच मातृसेवा करायची असेल तर मातीला जिवंत ठेवण्यासाठी काम करावे लागेल. यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल, मातीला जिवंत करण्याचा विचार पुढे आणावा लागेल, पुढे न्यावा लागेल, असे मत ज्येष्ठ केंद्रीय कृषी अर्थसल्लागार अशोक गुलाटी यांनी केले. .सिरसाळा येथील कृषीकुल येथे आयोजित पत्रकार परिषदेत बुधवारी (ता. २४) ते बोलत होते. यावेळी ट्रस्टचे मयंक गांधी, प्रकाशचंद्र पाटीदार, मृदा शास्त्रज्ञ सय्यद इस्माईल, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ दयानंद आगसकर, ज्येष्ठ फळबाग तज्ज्ञ डॉ. एम. बी. पाटील, डॉ. हरिश्चंद्र वंगे यांची उपस्थिती होती..Soil Health: शाश्वत पर्यावरण, मानवी आरोग्यासाठी मृदा संवर्धन महत्त्वाचे....ज्येष्ठ समाजसेवक मयांक गांधी म्हणाले, की ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाची देशाला गरज आहे. भारताच्या कृषी क्षेत्रात आर्थिक क्रांती आणण्याच्या दृष्टीने श्री. गुलाटी यांचे विचार आणि ज्ञानाचा नक्कीच भविष्यकालीन दूरगामी परिणाम होऊ शकतो. .Soil Health: माती, हवा, पाणी आणि सूक्ष्मजीवांचे संतुलन राखणे आवश्यक.मराठवाड्यात आणि विशेषतः बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व स्तरावरील शक्य तेवढे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी जिल्हा प्रशासन आणि ग्लोबल विकास ट्रस्ट मिळून समन्वय केला जात आहे. ज्याच्या माध्यमातून फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे..त्याचबरोबर कृषीकुल येथे शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देऊन उत्तमरीत्या फळबाग लागवड तंत्रज्ञान दिले. पिकवलेले उत्पादन उच्च बाजारपेठेत विकले जाऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळावा यासाठी निर्यातदार व्यापाऱ्यांशीही करार स्वरूपात पुढे पाऊल ठेवले जात आहे. जेष्ठ अर्थतज्ज्ञ श्री. गुलाटी यांनी सेंद्रिय शेतीची गरज,मातीचे आरोग्य, फळबाग प्रक्रिया उद्योग, पायाभूत सुविधा, शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ इत्यादी विषयांवर सखोल चर्चा करून मतप्रदर्शन केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.