Gold Rate : सोने-चांदी दरात चढउतार

सोने दर प्रतितोळा ५६ हजार ३८० रुपयांवर
Gold Rate
Gold RateAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : सोने-चांदीच्या (Gold Silver) किमतीत चढउतार सुरू आहेत. सोमवारी (ता. १६) सोन्याचा दर विक्रमी पातळीवर म्हणजेच ५६ हजार ८८३ रुपये प्रतितोळा होता. परंतु मंगळवारी (ता. १७) दरात घसरण दिसून आली.

मंगळवारी दर प्रतितोळा ५६ हजार ३८० रुपयांवर आला.
सोने दरात (Gold Rate) गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असताना सोमवारी विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोने दरात मंगळवारी घसरण होऊनही मंगळवारी दर उच्चांकी होता.

Gold Rate
Gold Rate : सोने दरात नरमाई; चांदीच्या दरात तेजी

यापूर्वी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याने ५६ हजार २०० रुपये दराची विक्रमी पातळी गाठली होती.
मंगळवारी सराफा बाजाराबरोबरच मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोने आणि चांदी दोन्हींच्या दरात घसरण दिसून आली.

मंगळवारी दुपारी एमसीएक्सवर सोने दर १०२ रुपयांनी कमी झाले. तसेच चांदी दर २७८ रुपयांनी घसरून ६९ हजार ५०८ रुपये प्रतिकिलो दरावर खाली आली.

मंगळवारी इंडिया बुलियन्स असोसिएशनने जाहीर केल्यानुसार २४ कॅरेट सोन्याचा भाव ५८ रुपयांनी घसरून ५६ हजार ८२५ रुपये प्रतितोळा झाला. चांदीचा दर ११८ रुपयांनी घसरून ६९ हजार ४०९ रुपये प्रतिकिलो झाला.

Gold Rate
Gold Rate : सोन्याच्या दरात एक हजारांची घसरण

मंगळवारच्या व्यवहारादरम्यान २३ कॅरेट सोन्याचा दर ५६ हजार ५९७ रुपये प्रतितोळा होता. २२ कॅरेटचा दर ५२ हजार ५२ रुपये प्रतितोळा आणि १८ कॅरेटचा दर ४२ हजार ६१९ रुपये प्रतितोळ्यावर ​पोहोचला.

सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ५६ हजार ८२५ रुपये प्रतितोळ्यावर बंद झाला होता. सध्या सणासुदीचे दिवस नसल्याने जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्याची खरेदी-विक्री कमी आहे. परंतु लग्नसराईनिमित्त मागणी टिकून आहे.

ग्रामीण भागातील ग्राहकही कमी असल्याचे दिसत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com