Gold Rate
Gold RateAgrowon

Gold Rate : सोने, चांदीच्या दरांत घसरण कायम; चांदीतही मंदी

ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत येताच सोने व चांदीची मागणीही कमी होत आहे. तसेच इंधन व इतर बाबतींत आंतराराष्ट्रीय स्तरावर प्रतिकूल स्थिती असल्याने सोने व चांदीच्या दरांत घसरण होत आहे.

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत येताच सोने व चांदीची मागणीही कमी होत आहे. तसेच इंधन व इतर बाबतींत आंतराराष्ट्रीय स्तरावर प्रतिकूल स्थिती असल्याने सोने व चांदीच्या दरांत घसरण होत आहे.

येथील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Rate) (जीएसटीविना) ५५ हजार ९०० रुपये प्रतितोळा, तर चांदीचे दर (जीएसटीविना) ६५ हजार ५०० रुपये प्रतिकिलो, असे आहेत.


केंद्रीय अंदाजपत्रकानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी सोने, चांदीच्या दरात वाढ झाली होती. सोन्याच्या दरात प्रतितोळ्यामागे ८०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल तीन हजारांची वाढ झाली होती.

महिन्यानंतर मात्र एक महिन्यात सोने दरात एक हजार ८००, तर चांदीत चार हजारांची घसरण दिसत आहे.

बजेटनंतर सोने, चांदीचे दर वाढतच होते. त्या वेळेस गुंतवणुकदारांमध्ये आनंद होता. तसेच सोने मोड करणाऱ्यांनाही काहीसा लाभ दिसत होता.

पण नव्याने सोने खरेदी महाग पडत होती. जानेवारीत सोन्याच्या दरात एक हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात एक हजारांची वाढ झाली होती. तेव्हा सोन्याचा दर ‘जीएसटी’सह ५८ हजार ८०० वर पोहोचला होता. चांदीचा दर ‘जीएसटी’सह ७२ हजार १०० वर पोहोचला होता.

सोने खरेदीस देशात प्रतिसाद असल्याने देशात सोन्याची वार्षिक मागणी एक हजार १०० ते एक हजार २०० टन एवढी आहे. त्यापैकी ५५ ते ६० टक्के खप हा ग्रामीण भागात होतो. पण ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. परिणामी, सोन्याची मागणी कमी व मोड अधिक अशी स्थिती कोविडनंतर कायम आहे.


Gold Rate
Gold Rate : सोने दरात नरमाई; चांदीच्या दरात तेजी

गेल्या काही दिवसांतील सोने, चांदीचे दर (विनाजीएसटी)
तारीख -- सोने प्रतितोळे -- चांदी प्रतिकिलो
२८ जानेवारी -- ५७ हजार ४०० -- ६९ हजार
१ फेब्रुवारी -- ५७ हजार ४०० -- ६९ हजार
२ फेब्रुवारी -- ५८ हजार २०० -- ७२ हजार
४ फेब्रुवारी -- ५७ हजार -- ६९ हजार
१२ फेब्रुवारी -- ५७ हजार ४०० -- ६७ हजार
१७ फेब्रुवारी -- ५६ हजार ३०० -- ६६ हजार
२६ फेब्रुवारी -- ५५ हजार ९०० -- ६५ हजार ५००
२८ फेब्रुवारी -- ५५ हजार ८०० -- ६५ हजार ४००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com