Fertilizer Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

India Fertilizer Sales: देशात खत विक्रीत नऊ टक्के वाढ

Increase in Fertilizer Sales: २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशातील खत विक्रीत ९.२ टक्क्यांची वाढ झाली असून युरिया, एमओपी आणि संयुक्त खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढले असून आयातीत घट झाली आहे.

Team Agrowon

Pune News: देशात २०२४-२५ मध्ये खतांची विक्री आधीच्या वर्षीच्या तुलनेत ९ टक्क्यांनी वाढली. युरिया, एमओपी आणि संयुक्त खतांची विक्री जास्त झाली. तर डीएपीची टंचाई निर्माण झाल्याने विक्रीही गेल्या वर्षीपेक्षा कमी राहिली. देशातील खतांचे उत्पादन वाढल्याने आयातही कमी झाली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, युरियाची विक्री २०२४-२५ (एप्रिल २०२४ ते मार्च २०५) मध्ये जवळपास ३८८ लाख टनांवर पोहोचली होती. मागील वर्षीच्या, म्हणजेच २०२३-२४ च्या तुलनेत विक्री ८.४ टक्क्यांनी जास्त होती. मागील हंगामात ३५८ लाख टन युरियाची विक्री झाली होती. एमओपी खताची विक्री तब्बल ३४ टक्क्यांनी वाढली. मागील वर्षी १६ लाख ४४ हजार टन एमओपीची विक्री झाली होती. ती २०२४-२५ मध्ये २२ लाख टनांवर पोचली.

संयुक्त खतांच्या विक्रीतही २८ टक्के वाढ दिसून आली. गेल्या वर्षी ११७ लाख टन संयुक्त खतांची विक्री झाली होती. ती नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात १५० लाख टनांवर पोहोचली. डीएपी खतांची विक्री मात्र काहीशी कमी झाली. गेल्या वर्षीच्या ११० लाख टनांच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये ९६ लाख टन डीएपी खत विक्री झाले. डीएपीची नोव्हेंबरपर्यंत टंचाई जाणवत होती. त्यामुळे मागणी असूनही डीएपी खतांची विक्री कमी दिसून आली.

देशातील खतांची एकूण विक्री २०२४-२५ मध्ये ९.२ टक्क्यांनी वाढली आहे. ६५६ लाख टन खते या वर्षात विकली गेली. तर आधीच्या वर्षातील विक्री ६०१ लाख टन होती. विशेष म्हणजे एकूण अंदाजित मागणीच्या तुलनेतही प्रत्यक्ष विक्री एक टक्क्याने अधिक झाली.

अंदाजित मागणीच्या तुलनेत विक्री जास्त

२०२५ च्या आर्थिक वर्षात युरियाची विक्री अंदाजित मागणीच्या तुलनेत ६.६ टक्क्यांनी वाढली. युरियाची एकूण ३६४ लाख टनांची मागणी होती. तर डीएपीची विक्री एकूण मागणीपेक्षा १४ टक्क्यांनी कमी राहिली. डीएपीची मागणी ११२ लाख टन होती. एमओपीची आणि संयुक्त खतांची विक्री अंदाजित मागणीच्या तुलनेत १ टक्क्याने कमी राहिली. एमओपीची अंदाजित मागणी २२ लाख टन होती तर संयुक्त खतांची मागणी १५१ लाख टन होती.

आयात घटली

भारताची खतांची आयातही ९.७ टक्क्यांनी कमी झाली. २०२४-२५ च्या आर्थिक वर्षात भारताने १५२ लाख टन खते आयात केली. आधीच्या वर्षीची आयात १६८ लाख टन होती. युरियाची आयात जवळपास २० टक्क्यांनी कमी झाली. गेल्या वर्षीच्या ७० लाख टनांवरून युरियाची आयात ५६ लाख टनांवर स्थिरावली. डीएपीची आयात १७ टक्के कमी होऊन ४६ लाख टनांवर आली. तर एमओपीची आयात ३० टक्क्यांनी वाढून २७ लाख टनांवर पोचली. संयुक्त खतांची आयातह ४ टक्क्यांनी वाढून २३ लाख टनांवर पोहोचली.

देशातील खत उत्पादनात वाढ

देशातील खतांचे उत्पादन २०२४-२५ मध्ये जवळपास ३ टक्क्यांनी वाढून ५१८ लाख टनांवर पोहोचले. युरियाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या ३१४ लाख टनांवरून ३०७ लाख टनांवर पोहोचले. डीएपीचे उत्पादन ४३ लाख टनांवरून ३८ लाख टन झाले. संयुक्त खतांचे उत्पादन ९५ लाख टनांवरून ११३ लाख टनांपर्यत वाढले. सिंगल सुपर फाॅस्फेटचे उत्पादन ४४ लाख टनांवरून ५२ लाख टनांपर्यंत वाढले. अमोनियम सल्फेटचे उत्पादन ६ लाख टनांवरून ८ लाख टनांपर्यंत वाढले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT