
Hingoli News ; हिंगोली ः कृषी विभागाने यावर्षीच्या (२०२५) खरीप हंगामासाठी (एप्रिल ते सप्टेंबर कालावधी) हिंगोली जिल्ह्याला ८२ हजार ३६३ टन खतांची मागणी केलेली असतांना कृषी आयुक्तालयाने विविध ग्रेडची ८९ हजार ६६९ टन रासायनिक खते मंजूर केली आहेत. यंदाच्या मागणीच्या तुलनेत ७ हजार ३०६ टन जास्त तर २०२४ च्या खरिपातील ८५ हजार ४५१ टनांच्या तुलनेत ४ हजार २१८ टन एवढी जास्त खते मंजूर करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ३ लाख ५४ हजार ४५५ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. जिल्ह्याचा सरासरी खतांचा वापर ८१ हजार ५६९ टन आहे. त्यानुसार ८२ हजार ३६३ टन रासायनिक खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे नोंदविली होती. परंतु जिल्ह्याला विविध ग्रेडच्या ८९ हजार ६६९ टन रासायनिक खतांचा साठा मंजूर करण्यात आला आहे.
त्यात युरिया१९ हजार ८८५ टन,सुपर फॉस्फेट १७ हजार १०० टन,पोटॅश- एमओपी २ हजार ७२० टन, डिएपी १२ हजार ९६४ टन,संयुक्त खते-एनपीके ३७ हजार टन या खतांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यासाठी ६ हजार ३९३ टन, मे महिन्यासाठी १० हजार ५५४ टन, जून महिन्यासाठी २१ हजार ९५९ टन, जुलै महिन्यासाठी १९ हजार ५७९ टन, ऑगस्ट महिन्यासाठी १७ हजार ३० टन, सप्टेंबर महिन्यासाठी १४ हजार १५५ टन खत साठा मंजूर झाला आहे.
३१ मार्च २०२५ अखेर विविध ग्रेडची १८ हजार ३९ टन खते शिल्लक होती. त्यात युरिया ५ हजार ५ टन, सुपर फॉस्फेट ८ हजार ३७७ टन, पोटॅश ९२ टन, डीएपी २८६ टन,संयुक्त खते-एनपीके ४ हजार २७७ टन या खतांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
हिंगोली जिल्हा खरीप हंगाम २०२५ मंजूर खते (टनामध्ये)
महिना युरिया सुपर फॉस्फेट पॉटेश डिएपी संयुक्त खते-एनपीके
एप्रिल १९८९ ११९७ १९० ११६७ १८५०
मे .२५८५ २०५२ २७२ १९४५ ३७००
जून ४१७६ ४२७५ ५१७ ३३७१ ९६२०
जुलै ४५७४ ३५९१ ५७१ २३३३ ८५१०
ऑगस्ट ३५७९ ३२४९ ५९८ २२०४ ७४००
सप्टेंबर २९८३ २७३६ ५७१ १९४५ ५९२०
हिंगोली जिल्हा खरीप हंगाम
तुलनात्मक खते मंजूर स्थिती (टनामध्ये)
खताचा प्रकार २०२४ २०२५
युरिया १६२०० १९८८५
सुपर फॉस्फेट १६१०१ १७१००
पोटॅश ३३०० २७२०
डिएपी १५८०० १२९६४
एनपिके ३४००० ३७०००
अमोनियम सल्फेट ५० ००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.