Papaya Sapling Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Papaya Plant Price: पपई रोपांच्या दरात घसरण

Papaya Sapling Price: खानदेशात नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान झालेल्या आगाप पपई लागवडीमुळे सध्या रोपांची मागणी घटली आहे. परिणामी, पपई रोपांचे दर प्रतिरोप १३–१७ रुपयांवरून ९–१० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात पपई रोपांचा पुरवठा सध्या अपेक्षेपेक्षा अधिक आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत आगाप पपई लागवड झाली आहे. सध्या पपई लागवड कमी किंवा हवी तेवढी नसल्याने पपई रोपांची मागणी, उठाव कमी असून, पपई रोपांचे दर घसरले आहेत.

पपई रोपांचे दर नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत प्रतिरोप १३ ते १७ रुपये, या दरात जागेवर किंवा पोच शेतकऱ्यांना मिळत होते. अनेक पपई रोपे निर्मात्यांनी रोपांच्या दरात वाढ केली. कारण ऑक्टोबरमध्ये पपईला जागेवर किंवा शिवार खरेदीत ३० ते ३२ रुपये प्रति किलोचा दर मिळाला.

नोव्हेंबरमध्येही जागेवर २८ ते २२ रुपये प्रति किलोचा दर मिळाला. यामुळे आगाप पपई लागवडीकडे या कालावधीत अनेकांचा ओढा होता. आगाप पपई लागवड खानदेशात नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत केली जाते. तर हंगामी लागवड फेब्रुवारीनंतर मे अखेरपर्यंत सुरू असते. सध्या १५ नंबर वाणाच्या पपई रोपांचे दर नऊ ते १० रुपये या दरात पोच मिळत आहेत. या रोपांची मागणी अधिक आहे.

कारण १५ नंबर वाणाच्या पपई पिकात रोगराई कमी असते. उत्पादनही बरे येते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. १५ नंबर वाणाच्या पपई रोपांचा पुरवठा धाराशिव, जालना, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व जळगाव, धुळे जिल्ह्यांतील विविध रोपवाटिकाचालक करीत आहेत. तसेच ७८६ वाणाच्या पपई रोपांनाही उठाव आहे. पण तुलनेत ७८६ वाणाची लागवड कमी होताना दिसत आहे.

कारण या वाणावर रोगराई अधिक असते. या वाणात उत्पादन चांगले येते, पण रोगराईमुळे खर्च अधिक असतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पपईखालील क्षेत्र खानदेशात यंदा वाढले आहे. यामुळे पपई रोपांची मागणीही आहे. परंतु मागील सात ते आठ दिवसांत रोपांची मागणी कमी असल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: ‘वैशाख वणव्या’पूर्वीच होरपळ

Unseasonal Rain Relief GR: अवकाळीग्रस्त ९ जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ५३ कोटी ७३ लाख मदत मंजूर

Cotton, Soybean Rate: हळदीच्या भावात सुधारणा होण्याचे संकेत आहेत का ?

Village Development: गावच्या विकास निधीसाठी आता ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र अनिवार्य

Silk Production: ‘महारेशीम अभियाना’ला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद: वडवळे

SCROLL FOR NEXT