
Akola News: पपईच्या दरात गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण सुरू झाली आहे. यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सध्या पपईचा दर प्रति क्विंटल ५०० ते ६०० रुपयांपर्यंत घसरला आहे. तर काही ठिकाणी हा दर याहीपेक्षा कमी मिळू लागल्याचे शेतकरी सांगत आहेत. शिवाय या परिस्थितीत खरेदीदारही माल घ्यायला तयार नसल्याने आगामी काही महिने या बागा केवळ जगवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
रमजान ईदपर्यंत पपईचा दर १८ ते २० रुपयांपर्यंत जागेवर शेतकऱ्यांना मिळत होता. आता बाजारात अचानक दरात घसरण झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बाजारातील मागणी कमी झाली असल्याचे सांगितले जात आहे.
तेल्हारा तालुक्यातील शेतकरी अनिल इंगळे पाटील म्हणाले, ‘‘पपईला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आता व्यवस्थापनाचा खर्चसुद्धा निघणे कठीण झालेले आहे. आधी टरबूज-खरबूज पिकाने या भागात प्रचंड नुकसान केले आहे. येत्या काळात बाजारात आंब्याची आवक वाढल्यानंतर पपईचे मार्केट आणखी खालावण्याची भीती आहे.’’
राज्यात पपईचे दर शहादा येथे काढले जातात. तेथे मार्चपर्यंत हंगाम चालतो. या ठिकाणी भारतातील विविध राज्यांतील खरेदीदार येत असतात. तेथील हंगाम आता आटोपल्याने हे व्यापारी आंध्र, कर्नाटकात निघून गेले. त्या ठिकाणी पपई पाच रुपयांपर्यंत विकली जात आहे. तेच दर राज्यात विविध भागांत लागू केले जात आहेत. मागणी कमालीची कमी झाल्याने व्यापारी बागांकडे यायला तयार नाहीत. उष्णतेमुळे फळांवर पांढरे चट्टेही पडत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.