Papaya Market: खानदेशात पपई आवक अल्प; दरातही मोठी घट

Papaya Rate: खानदेशात यंदा पपई उत्पादनावर वातावरणीय बदलांचा गंभीर परिणाम झाला असून दर अत्यंत घसरले आहेत. प्रतिकूल हवामान, मागणीअभावी उठाव कमी आणि प्रति किलो केवळ ३ ते ४ रुपयांपर्यंत दर असल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.
Papaya
PapayaAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News: खानदेशात पपई दराचा तिढा या हंगामात अलीकडे तयार झाला आहे. यंदा प्रतिकूल स्थितीमुळे पपई आवक अल्प किंवा कमी राहिली. त्यात कमी दर, वाढत्या उष्णतेमुळे घटलेला उठाव यामुळे अनेकांनी पपई पीक काढले असून, पपईची आवक सध्या कमी किंवा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातील आवकेपेक्षा कमी आहे. पपईला जागेवर किंवा शिवार खरेदीत शेतकऱ्यांना प्रति किलो तीन ते चार रुपये दर मिळत आहेत.

किमान दर दोन ते तीन रुपये प्रति किलोचा आहे. शेतकऱ्यांना जागेवर दर सध्या कमी मिळत आहे. त्यात उत्पादन कमी किंवा हवे तसे नाही. यंदाच्या अतिपावसानंतर अतिउष्णतेमुळे हंगामास फटका बसला आहे. परिणामी आवकेवर त्याचा परिणाम दिसत आहे.

Papaya
Papaya Price Crash: पपईच्या दरात मोठी घसरण; प्रति किलोला ५ ते ६ रुपये भाव

पपईचा काढणी हंगाम खानदेशात ऑक्टोबरमध्ये जोमात सुरू होतो. यंदा विषम वातावरण व इतर समस्यांमुळे उत्पादन कमी आहे. रोपांची उपलब्धता यंदा चांगली होती. यात अनेकांनी पपईची लागवड मे महिन्यात किंवा उशिरा केली आहे. यामुळे आवकही कमी होती. दुसरीकडे खरेदीदारांकडून पपईस सध्या मागणी कमी आहे.

Papaya
Papaya Farming Crisis: पपईखालील मोठे क्षेत्र खानदेशात रिकामे

कारण पपई उष्ण पीक असून, हिवाळ्यात त्यास अधिक मागणी असते. मार्चनंतर किंवा उन्हाळा सुरू झाल्यानंतर पपईची मागणी कमी होते. त्यात आता पीक किंवा उत्पादन कमी असूनही दर घटले आहेत. सध्या खानदेशात प्रति दिन सहा ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) पपईची आवक होत आहे. ही आवक जानेवारी-फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत निम्मीही नाही.

खानदेशातील पपईला उत्तर भारतात मोठी मागणी असते. पण आता उठाव घटला आहे. पपई दरात पुढे आणखी घट होईल, असे संकेत आहेत. कारण उत्तरेकडे ऊन तापू लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com