Marine Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Marine Export : समुद्रमार्गे निर्यात महागली

Agriculture Export : तांबड्या समुद्रातील जहाजांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे जहाज वाहतूक ठप्प झाली आहे.

गणेश कोरे

Pune News : तांबड्या समुद्रातील जहाजांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे जहाज वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी, भारतातून होणाऱ्या फळांच्या निर्यातीला अडचणी निर्माण झाल्या असून, मोठा वळसा घालून जहाजांना प्रवास करावा लागत असल्याने जहाजांच्या भाडेदरांमध्ये वाढ झाली आहे. तर निर्यातदारांनी विमानांना पसंती दिल्याने, याचा फायदा विमान कंपन्यांनी देखील घेतला असून, विमान कंपन्यांनी देखील दरवाढ केली आहे.

या बाबतची माहिती मुंबई बाजार समितीचे संचालक आणि फळे अडते असोसिएशनचे अध्यक्ष संजय पानसरे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘नुकताच रमजानचा महिना सुरू झाला असून, युरोप आणि अमेरिका या देशांमध्ये भारतातून आणि विशेषतः महाराष्ट्रातून द्राक्षे, डाळिंब, कर्नाटकचे आंबे यांची निर्यात सुरू झाली आहे.

मात्र नुकत्याच तांबड्या समुद्रातील जहाजांवर दहशतवादी हल्ले झाल्याने ही समुद्र मार्गे होणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. जहाज कंपन्यांना आपला मार्ग बदलावा लागल्याने मोठा वळसा घालून जावे लागत आहे.

परिणामी, जहाजांची भाडेदरवाढ झाली आहे. तर निर्यातदारांनी आखाती देशांमध्ये वेळेवर फळे पोहोचविण्यासाठी विमान कंपन्यांकडे मागणी नोंदविली; मात्र मुबलक कार्गो स्लॉट उपलब्ध होत नसल्याने त्यांनी देखील १०० टक्‍क्यांनी दरवाढ केली आहे. या बाबत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पत्र व्यवहार करावा, अशी आमची मागणी आहे.

‘‘हमास आणि इस्राईलच्या युद्धात ‘हुती’ दहशतवादी संघटनेने जहाजे ओलिस ठेवली आहेत. परिणामी, जहाजांना मार्ग बदलावा लागल्याने, वाहतूक २५ -३० दिवसांनी वाढली आहे. यामुळे शेतीमाल वेळेत दाखल होत नसल्याने निर्यातदारांचे नुकसान सुरू झाले आहे. तर निर्यातदारांनी द्राक्षे, डाळिंब, आंबे आदींची खरेदी कमी केल्याने दर कमी होत आहेत.
- अभिजित भसाळे, निर्यातदार, रेन्बो इंटरनॅशनल, पुणे
तांबडा समुद्रमार्गे जाणाऱ्या जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमुळे, बरीच जहाजे केप ऑफ गुड होपमार्गे जात आहेत. त्यामुळे प्रवासाचे अंतर वाढले, कालावधी १५-२० दिवसांनी वाढला. पर्यायाने वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कृषिमाल नाशिवंत असल्याने वाढलेल्या अंतराने माल वाहतूक शक्य नाही. काही वेळा विमानमार्गेच माल पाठवावा लागतो. त्यामुळे विमानवाहतुकीवर आलेल्या ताणामुळे विमान खर्चातही लक्षणीय वाढ झाली आहे. याचा परिणाम राज्यातील कृषिमालाच्या निर्यातीवर होत आहे.
- संजय कदम, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shet Raste GR : शेत आणि पाणंद रस्ते योजनेच्या समितीत पाच प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश; राज्य सरकारचा निर्णय

Farmer Loan Waiver : हमीभाव, कर्जमुक्ती, बियाणे विधेयकाविरोधात फेब्रुवारीपासून देशव्यापी आंदोलन यात्रा; शेतकरी नेते डल्लेवाल यांची घोषणा

Kanda Karpa: कांद्यावरील करप्याचे तीन प्रकार! तुमच्या कांद्यावर कोणता करपा आलाय जाणून घ्या लक्षणांमधून..

Wildfire Prevention: वणवा रोखण्यासाठी वनविभाग सज्ज

Leopard Sighting: बिबट्याचा वावर वाढल्याने रात्री पिकांना पाणी देणे धोकादायक

SCROLL FOR NEXT