Raigad News: खालापूर तालुक्यातील वनविभागाच्या ताब्यात असलेली मौल्यवान वनसंपत्ती वाचवण्यासाठी वनविभागाने कंबर कसली असून, स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने जाळरेषा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. तालुक्याला सुमारे १० हजार हेक्टर वनक्षेत्र लाभले असून, उन्हाची तीव्र झळ, सुकलेले गवत व मानवनिर्मित आगी यामुळे दिवसेंदिवस वणव्याचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे त्याला रोक लावण्यासाठी वनविभागाकडून थेट जाळरेषा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे..खालापूर तालुक्यात दिवसाआड वणव्याच्या घटना घडत असून वनसंपत्तीवर गंभीर घाला घातला जात आहे. सुकलेल्या गवतामुळे छोटीशी ठिणगी क्षणार्धात भीषण आगीत रूपांतरित होत असून, अशा आगी प्रचंड वेगाने पसरतात. डोंगराळ व दुर्गम भागात लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. या आगीत औषधी वनस्पती, दुर्मिळ वृक्ष, सरपटणारे प्राणी व अन्य जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे..Wildfire : जंगलात वणवा लागू नये म्हणून अशी घ्या काळजी .या आगी विझवताना वनविभागाला मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे ठोस उपाययोजना म्हणून वणव्याचा प्रसार रोखण्यासाठी वनविभागाच्या हद्दीत साधारण सहा मीटर रुंदीच्या जाळरेषा तयार केल्या जात आहेत. या जाळरेषांमुळे आगीचा फैलाव रोखता येतो आणि छोटी ठिणगी मोठ्या आगीत रूपांतरित होण्यापासून प्रतिबंध होतो. विशेषतः डिसेंबरमध्ये हे काम केले जाते, कारण यावेळी गवत पूर्णपणे सुकलेले नसल्याने आग वेगाने पसरत नाही. त्यामुळे पहाटेच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी स्थानिक जंगलाची माहिती असलेल्या ग्रामस्थांसह हे काम करत आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन फायर ब्लोसारखी यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे..Diabetes Prevention : मधूमेह होऊ नये यासाठी काय करावं? .जनजागृतीवर भरखालापूर तालुक्यात दररोज कुठे ना कुठे वणव्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वनविभागाकडून गाव, वाडी-वस्त्यांमध्ये स्थानिकांच्या मदतीने वणवा प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती केली जात आहे. मानवनिर्मित वणव्यामुळे झालेली हानी भरून येण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी लागतो. पर्यावरणाची होणारी अपरिमित हानी टाळण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती अभियान राबवले जात आहे..निगडोली परिमंडळातील विनेगाव, भिलवले ठाकुरवाडी, भिलवले गाव, कलोते मोकाशी ठाकुरवाडी, तळवली व दांडवाडी येथे वणवा व बिबट्याबाबत बैठका घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. जंगलाचे नुकसान होऊ नये, ते वाढावे आणि वणव्यापासून संरक्षण मिळावे यासाठी वनविभाग दरवर्षी जाळरेषा तयार करण्याचे काम करीत आहे.- कल्पना बांगर, वनरक्षक, खालापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.