Nashik News: ताहाराबाद (ता. बागलाण) परिसरात अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी (ता. ५) महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले..ताहाराबादसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याने पाळीव प्राण्यांबरोबरच शेतकऱ्यांवरही हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी पाणी भरण्यासाठी शेतात जाणे धोकादायक झाले आहे..Leopard Sighting: विंगला घडतेय बिबट्याचे आता सहज दर्शन.इतर गावांप्रमाणे आम्हालाही दिवसा वीज मिळावी, जेणेकरून आम्ही बिबट्याच्या दहशतीपासून सुरक्षित राहून शेती वाचवू शकू, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येत महावितरणचे अधिकारी ए. जे. श्रीवास्तव यांची भेट घेतली..Leopard Sighting: वाहोलीपाडा परिसरात बिबट्याची दहशत.या वेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडत युद्धपातळीवर दिवसा वीज देण्याचे नियोजन करण्याची मागणी केली. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चित्ते, जयवंत साळवे, भैय्या महाजन, मनोहर नंदन, ग्रामपंचायत सदस्य दीपक कांकरिया, यशवंत पवार, नितीन घरटे, राजेंद्र साळवे, पप्पू खैरनार, उमेश गांगुर्डे, कुणाल नंदन, वैभव महाजन यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..नवीन ट्रान्स्फॉर्मर ‘महावितरण’ कार्यालयात दाखल झाला असून, तो बसविण्यासह यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी कालावधी लागणार आहे. ‘महावितरण’ कार्यालयामागे कमी जागेत वीजप्रवाहात काम करणे अवघड आहे. जर वीजपुरवठा बंद करून काम केले तर गावातील नागरिकांची गैरसोय होऊ शकते. यामुळे सुरक्षित पद्धतीने व वीजपुरवठा खंडित न करता काम करून महिनाभरात नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविणार आहे.- ए. जे. श्रीवास्तव–महावितरण अधिकारी, ताहाराबाद.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.