Agricultural Commodity Export : भारतीय शेतीमाल तपासणी युरोपने केली अधिक काटेकोर

Agricultural Commodity Inspection of India : युरोपीय देशांत आयात होणाऱ्या भारतीय शेतीमालांमध्ये कीडनाशकांचे अंश व अफ्लाटॉक्सीन या विषारी घटकांचा धोका टाळण्यासाठी तपासणी प्रक्रिया अधिक काटेकोर करण्याचा निर्णय युरोपीय महासंघाने घेतला.
Agricultural Commodity Export
Agricultural Commodity ExportAgrowon
Published on
Updated on

APEDA : पुणे (प्रतिनिधी) : युरोपीय देशांत आयात होणाऱ्या भारतीय शेतीमालांमध्ये कीडनाशकांचे अंश व अफ्लाटॉक्सीन या विषारी घटकांचा धोका टाळण्यासाठी तपासणी प्रक्रिया अधिक काटेकोर करण्याचा निर्णय युरोपीय महासंघाने घेतला. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये कढीपत्ता, भुईमूग, नागवेली (खाऊ) पाने व ढोबळी मिरची आदी शेतीमालांच्या तपासणीबाबत अधिकृत नियंत्रण पद्धतीत वाढ केल्याची माहिती ‘अपेडा’ने दिली आहे.

भारतातून युरोपीय देशांमध्ये निर्यात होणाऱ्या विविध शेतीमालांमध्ये कढीपत्ता, भुईमूग, ढोबळी मिरची, नागवेली पाने आदींचा समावेश होतो. यामध्ये कीडनाशकांचे अवशेष व अफ्लाटॉक्सीन सारख्या शेतीमालाचे प्रमाण आढळण्याविषयी कमाल अवशेष मर्यादा (एमआरएल) निश्‍चित करण्यात आली आहे. शेतीमाल तपासणी प्रक्रियेसंबंधीच्या वर्गवारीत कढीपत्याचा समावेश परिशिष्ट एक (ॲनेक्शर वन) वरून दुसऱ्या परिशिष्टात करण्यात आला आहे.

Agricultural Commodity Export
Agriculture Commodity Market Price : शेतीमाल बाजारावरील मंदीचे ढग कायम

तपासणीच्या अधिकृत नियंत्रण प्रक्रियेत वाढ केली आहे. युरोपात मालाचा प्रवेश झाल्यानंतर नमुन्यातील घटकांचा आढळ व तपासणी या प्रक्रियेची तीव्रता वा संख्या ५० टक्के ठेवण्यात आली. त्यावरील अधिकृत नियंत्रण वाढवले आहे. त्याचबरोबर संबंधित शेतीमालाच्या नमुन्याची कीडनाशक अवशेषांसाठी तपासणी झाली आहे व त्यात युरोपीय महासंघाच्या कायदा नियमावलीनुसारचा अवशेषांचा आढळ नाही असे अधिकृत प्रमाणपत्र गरजेचे आहे. भारतीय भुईमुगात अफ्लाटॉक्सीन या विषारी घटकाचा आढळ होऊ शकतो व त्याचा मानवी आरोग्याला धोका पोहोचू शकतो या मुद्द्याला युरोपीय महासंघाने अधिक महत्व दिले आहे. त्यादृष्टीने त्याच्या तपासण्याही ५० टक्क्यांनी वाढविण्यात आल्या आहेत.

भारतीय नागवेलीची (खाऊची) पाने ज्या युरोपीय देशात आयात होतील तेथे अधिकृत यंत्रणेमार्फंत त्यावरील नियंत्रण पातळीची संख्या वाढविली आहे. त्याचा समावेश युरोपीय कायदे नियमवलीच्या परिशिष्ट दोनवरून एकमध्ये केला आहे. भारतीय ढोबळी मिरचीचा समावेश सद्य:स्थितीत परिशिष्ट दोनमध्ये आहे. मात्र नमुन्यातील घटकांचा आढळ व तपासणी या प्रक्रियेची संख्या २० वरून १० टक्क्यांवर ठेवली आहे.

विविध घटकांवर होतोय नियंत्रण
केवळ भुईमूगच नव्हे तर अफ्लाटॉक्सीनच्या आढळाचा धोका ओळखून भारतीय जायफळाच्या तापसण्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय युरोपीय महासंघाने जुलै २०१९ पासूनच घेतला आहे. त्यानुसार युरोपीय सदस्य देशांकडून उपलब्ध होत असलेल्या माहितीच्या आधारे या नियमावलीच्या पूर्ततेमध्ये सुधारणा झाली आहे.

अन्नपदार्थांबरोबरच युरोपीय देशांव्यतिरिक्त अन्य देशांतून येणाऱ्या पशुखाद्यांसाठीही नियमावली निश्‍चित कर आली आहे. यामध्ये कीडनाशक अवशेष व अफ्लाटॉक्सीन यांच्या व्यतिरिक्त बुरशीवर आधारित अन्य विषारी पदार्थ, सूक्ष्मजीवांचा संसर्ग वा दूषितीकरण, पेंटाक्लोरोफिनॉल व डायक्झीन्स आदी घटकांच्या आढळावरही नियंत्रण ठेवण्यात येत आहे.

युरोपीय महासंघाच्या (रास्फ RASFF) या संस्थेकडून अलीकडेच इशारा देण्यात आला आहे. यामध्ये दूषित झालेले अन्न व अप्राणीजन्य पशुखाद्यामुळे मानवी आरोग्याला प्रत्यश्र किंवा अप्रत्यक्ष गंभीर धोके उद्‍भवू शकतील असे सूचित करण्यात आले आहे. त्यादृष्टीनेच मानवी आरोग्याचे संरक्षणाच्या दृष्टीने युरोपीय सदस्य देशांकडून अन्नपदार्थांचे वर्गीकरण परिशिष्ट एक व दोनमध्ये करण्यात आले आहे.

रास्फद्वारा उपलब्ध तपशीलाचा आधारे कीडनाशकांच्या अवशेषांमुळे इजिप्तमधून येणाऱ्या संत्र्यांपासून नवा धोका सूचित करण्यात आला आहे. अशा शेतीमालांना परिशिष्ट एकमध्ये वर्ग ेकेले आहे. त्याचबरोबर भारत व पाकिस्तानातून येणाऱ्या भातामध्येही कीडनाशकांच्या अवशेषांचा धोका सूचित केला असून त्यादृष्टीने युरोपीय महासंघासाठी अधिकृत नियंत्रण पातळी वाढविणे गरजेचे ठरले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com