Garlic  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Garlic Rate : श्रावण असूनही लसूण खातोय भाव

Team Agrowon

Akola News : श्रावण, चातुर्मासात कांदा, लसूण खाण्याचे प्रमाण काहीसे घटते. त्यामुळे या काळात मागणी कमी असते, असे म्हटले जाते. मात्र अकोल्यात लसणाला किमान १५, तर कमाल २७ हजार रुपयांदरम्यान प्रतिक्विंटलला दर मिळतो आहे. कमाल दरात या महिनाभरात सुमारे ७ ते ८ हजार रुपयांची वाढ झाली आहे.

अकोल्यात मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशातील विविध भागांतून लसणाची आवक होत असते. दररोज किमान ४ ते ५ ट्रक आवक होते. सध्याची आवक साडेचारशे ते पाचशे क्विंटलपर्यंत आहे.

मागील काळात सर्वदूर झालेल्या पावसाने लसणाचे बरेच नुकसान झाले. चांगल्या दर्जाचा लसूण कमी प्रमाणात बाजारात येऊ लागला. सध्या बाजारात आवक झालेल्या उच्चतम दर्जाच्या लसणाला २५ ते २७ हजारांदरम्यान दर मिळतो आहे. दुय्यम प्रतीच्या लसणाला सुद्धा सध्या १५ हजारांपासून दर मिळतो आहे. या बाजारात शुक्रवारी (ता.३०) किमान दर १५ हजार व कमाल दर २७ हजार इतका होता.

सुमारे ४२२ क्विंटल लसणाची आवक झाली होती. साधारणपणे महिनाभरापूर्वी म्हणजेच ऑगस्टच्या प्रारंभी बाजारात लसूण १४ ते १९ हजारांदरम्यान विकत होता. गेल्या आठवड्यातही १२ ते २४ हजारांदरम्यान दर होता. आता मात्र दरांनी मोठा टप्पा गाठला. १५ ते २७ हजारांदरम्यान विक्री होऊ लागली आहे.

सणासुदीच्या तोंडावर वाढलेला लसणाचा दर आगामी काळात किती दिवस टिकून राहतो याबाबत व्यापाऱ्यांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे. सततच्या पावसामुळे नुकसान झाल्यामुळे व आवकही कमी असल्याने हा दर वाढलेला असावा, असेही जाणकार सांगत आहेत. यामुळे किरकोळ बाजारात तेजी आली आहे. आवक सुधारल्यास कदाचित हे दर कमी होऊ शकतील असे सांगण्यात येत आहे.

किरकोळ विक्री महागली

किरकोळ बाजारात दर्जात्मक लसूण थेट ३८० ते ४०० रुपये किलोने व्यापारी विकत आहेत. दुय्यम लसूणही २०० ते २५० रुपयांपासून विक्री होतो आहे. दोन्ही प्रकारच्या लसणामध्ये दीडपटीचा फरक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक

Fig Management : अंजिरातील मीठा बहर व्यवस्थापन

Warana Milk : म्हैस खरेदीसाठी ४२ हजारांचे अनुदान, वारणा दूध संघाचा निर्णय

Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षिततेचे उपाय

Agri Tourism : मावळ तालुका झालाय ‘कृषी पर्यटन हब’

SCROLL FOR NEXT