Pune News : तालुक्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे भाटघर धरण खोऱ्यात आणि भुतोंडे खोऱ्यात भातखाचरांच्या ताली पडल्या असून भातशेतीचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरु आहे.
तालुक्याच्या पश्चिमेकडील भाटघर धरण आणि नीरा-देवघर धरण खोऱ्यासह भूतोंडे खोरे, वेळवंड खोरे, हिर्डोशी खोरे, आंबवडे खोरे आणि वीसगाव खोरे या भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. शनिवारी (ता. २४) झालेल्या मुसळधार पावसामुळे भूतोंडे खोऱ्यातील कांबरे बुद्रुक आणि कांबरे खुर्द या गावातील शेतकऱ्यांच्या डोंगरालगत असलेल्या भातशेतीचे नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे भातखाचरांच्या ताली पडल्या आहेत तर काही ठिकाणी शेतीचे बांधासह भाताचे लावलेले पीकही वाहून गेले आहे. प्राथमिक माहितीनुसार कांबरे बुद्रुक आणि कांबरे खुर्द मधील शेतकरी नारायण दगडू चिकणे, पांडुरंग लक्ष्मण चौधरी, तुकाराम हरिश्चंद्र चौधरी, धर्मा सुकाळे, संदीप सुकाळे, समीर सुकाळे, अनंता जंगम आणि संतोष गणपत सुकाळे या शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे.
कांबरे खुर्द गावाबरोबर अनेक गावातील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतक-यांची संख्या वाढणार आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.