Egg Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Eggs Rate : अंडी उत्पादन घटल्याने दराने घेतली उसळी

Eggs Production : मंदीचा फटका लेअर पोल्ट्री व्यवसायाला बसल्याच्या परिणामी राज्यात एकूण लेअर फार्मच्या २५ टक्‍के फार्म बंद पडल्याचा दावा केला जात आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravti News : मंदीचा फटका लेअर पोल्ट्री व्यवसायाला बसल्याच्या परिणामी राज्यात एकूण लेअर फार्मच्या २५ टक्‍के फार्म बंद पडल्याचा दावा केला जात आहे. त्याच्याच परिणामी राज्यात अंडी दरात तेजी आल्याचे सांगितले जात आहे. सध्या अंडी दर ६४५ रुपये प्रती शेकड्यावर पोहोचला आहे.

शालेय पोषण आहारातील समावेशाचा दरावर तितकासा परिणाम झाला नाही, असेही या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. राज्यात अंडी दरात सातत्याने मंदी अनुभवली गेली आहे. नजीकच्या काळात तर दर तीन ते साडेतीन रुपये प्रती नग याप्रमाणे खाली आले होते तर उत्पादकता खर्च साडेचार रुपये होता.

याच्या परिणामी उत्पादकता खर्चाची भरपाई देखील शक्‍य होत नसल्याने लेअर पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले होते. कोरोनापासून ही स्थिती होती. त्यानंतर गेली अनेक वर्ष ही स्थिती कायम असल्याने या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नव्हता.

त्यामुळेच अनेकांनी या व्यवसायातून माघारीचा निर्णय घेतला. राज्यात दोन हजारावर लेअर पोल्ट्री व्यावसायिक आहेत. त्यातील २५ टक्‍के म्हणजे सरासरी ५०० व्यावसायिकांनी हा व्यवसाय बंद केला. परिणामी आता १४०० ते १५०० च्या आसपास लेअर पोल्ट्री व्यावसायिक या क्षेत्रात उरल्याचे सांगितले जाते.

या परिस्थितीमुळे आता अंड्यांची मागणी आणि पुरवठा यात तफावत आल्याने अंड्याचे दर वधारले आहेत. देशासह राज्यात अंड्यांना सरासरी ६२० रुपये प्रती शेकडा असा दर मिळत आहे. त्यात सातत्याने वाढ नोंदविली जात असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात कोरोनानंतर आलेल्या मंदीमुळे अनेकांनी लेअर पोल्ट्री व्यवसायातून माघार घेतली. सरासरी २५ टक्‍के फार्म बंद पडले. त्याच्याच परिणामी आता मागणी आणि पुरवठ्यात तफावत असल्याने दरात तेजी आली आहे. शालेय पोषण आहारातील समावेशाचा विशेष फरक पडल्याची स्थिती नाही. कारण देशभरात अंडी दर वधारले आहेत. ६२० ते ६४५ प्रती शेकडा असा दर अंड्यांना मिळत आहे.
- शाम भगत, समन्वयक, नॅशनल एग्ज को-ऑर्डीनेशन कमिटी, महाराष्ट्र
अमरावती जिल्ह्यात मोठ्या संख्येने लेअर पोल्ट्रीधारक असून ८ लाख अंडी उत्पादकता एकट्या अमरावती जिल्ह्याची आहे. गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रात मंदी होती. आता मात्र सातत्याने तेजी अनुभवली जात आहे.
- रवींद्र मेटकर, लेअर पोल्ट्री व्यावसायिक, अंजनगावबारी, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT