Nagpur News : अंडी दरात सातत्याने होणाऱ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर शालेय पोषण आहारांतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या अंडी दरातही वाढ करावी, अशी मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर शासनाने नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटीच्या संकेतस्थळावरील दर विचारात घेत त्याआधारे प्रत्येक महिन्याला सरासरी दर देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक संघटना तसेच स्वयंसाह्यता समूहांनी दरवाढीची मागणी केली होती.
केंद्र पुरस्कृत पंतप्रधान पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत मंजूर वार्षिक अंदाजपत्रकाच्या पाच टक्के निधीतून नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अतिरिक्त पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्याचे निर्देश केंद्र शासनाचे आहेत. त्यानुसार २३ आठवड्यांकरिता नियमित पोषण आहारासोबत अंडी किंवा केळी यांचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याकरिता पाच रुपये प्रति नग असा अंड्याचा दर निश्चित करण्यात आला होता. मात्र देशासह राज्यात अंड्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने अतिरिक्त पैशाची सोय कशी करावी, असा प्रश्न शिक्षक तसेच पोषण आहार देणाऱ्या महिला स्वयंसाह्यता समूहांसमोर होता.
त्यामुळे बाजार दरानुसार अंड्यांच्या दरात वाढ करावी, अशी मागणी त्यांच्याद्वारे होत होती. त्या पार्श्वभूमीवर शासनाने आता अंडी दरात वाढीचा निर्णय घेतला आहे.
नॅशनल एग्स को-ऑर्डिनेशन कमिटी यांच्या संकेतस्थळावर प्रदर्शित होणाऱ्या संबंधित महिन्याच्या मासिक सरासरी दरानुसार सदर महिन्यातील कालावधीसाठी निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून या संदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.