Pulses Import : केंद्र सरकार कडधान्य उत्पादनातील तूट भरून काढण्यासह आयात कमी करण्यासाठी कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राबवत आहे. याच कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाला राबवण्यासाठी राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता आज (ता.२८) दिली आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीत अभियान राबवले जाणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे..केंद्र सरकारने या अभियानासाठी २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीसाठी ११ हजार ४४० कोटींची तरतूद केली आहे. राज्यातील विविध कृषी-हवामान पट्ट्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवले जाईल. यामध्ये कडधान्य उत्पादनासाठी योग्य शेती क्षेत्र, पिक पध्दती, हवामान आणि मागील हंगामातील उत्पादन क्षमता या निकषांवर जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला शेतकऱ्यांना विविध योजनांतून लाभ देण्यात येणार आहे..केंद्र सरकार या अभियानासाठी मूलभूत बियाणे खरेदी आणि पायाभूत बियाणे उत्पादनासाठी १०० टक्के हिस्सा उचलणार आहे. तर उर्वरित बाबीसाठी ६०;४० प्रमाणे केंद्र आणि राज्य हिस्सा राहील, असे शासन निर्णयात सांगण्यात आले आहे. तसेच अभियानातर्गत केंद्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसह शेतकरी महिलांना प्राधान्य देत प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि इतर उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. तर बियाणे वितरण, अनुदाने आणि उत्पादन योजना या सर्वांमध्ये या प्रवर्गांना अग्रक्रम ठेवण्यात येणार आहे..उद्दिष्ट काय?कडधान्य अभियानामुळे कडधान्य उत्पादनात लक्षणीय वाढ होईल. तसेच कडधान्य आयातीत घट होईल, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांचे बियाणे खर्च कमी करण्यासह उच्च प्रतीचे प्रजनन बियाणे उपलब्ध करून देणे, शेतकरी प्रशिक्षण व तंत्रज्ञान प्रसार वाढ आणि हेक्टरी उत्पादनात वाढ करण्याचा मनोदय केंद्र सरकारने स्पष्ट केला आहे..धोरण लकव्याचा परिणामकेंद्र सरकारने कडधान्य आयातीसाठी पायघड्या पसरलेल्या आहेत. देशात २०२४-२५ या आर्थिक वर्षात विक्रमी ६७ लाख टन कडधान्य आयात केली आहे. कडधान्य आयातीचा लोंढा सुरु असल्याने देशातील तूर, हरभरा, मुग आणि उडीद उत्पादक जेरीस आले आहेत. त्यामुळे एकीकडे केंद्र सरकार कडधान्य उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आव आणत आहे. तर दुसरीकडे मात्र कडधान्याच्या खुल्या आयात धोरणामुळे शेतकऱ्यांना किफायतशीर दरही मिळत नाही. .Pulses Import: तूर, वाटाणा मुक्त आयातीमुळे तुरीची झाली माती.सरकार केवळ कडधान्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आटापिटा करत असल्याचे दिसते. त्यामुळे कडधान्य उत्पादन वाढीच्या उद्दिष्टावर सरकारच पाणी ओतत असल्याचे जाणकार सांगतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.