Kapus Bajar Bhav  agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Kapus Bajarbhav: कापसाचा बाजारामुळे शेतकरी मोटाकुटीला; हमीभावापेक्षाही मिळतोय कमी भाव

Cotton Rate : देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव दबावातच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेला पुरवठा आणि कमी मागणी याचा दबाव बाजारावर दिसत आहे.

अनिल जाधव

Pune News : देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव दबावातच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेला पुरवठा आणि कमी मागणी याचा दबाव बाजारावर दिसत आहे. तर देशातील उत्पादन कमी राहूनही बाजारातील आवक आणि कमी मागणी याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. आजही देशातील बाजारात कापसाला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला.

देशातील बाजारात कापसाची आवक वाढलेलीच आहे. कापसाची दैनंदीन आवक २ लाख गाठींच्या दरम्यान आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात आवक काहीशी कमी होती. पण नोंव्हेंबरपासून आवक वाढली. तर डिसेंबर महिन्यात आवकेचा दबाव चांगलाच वाढला होता. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने निर्यात धिमी आहे. तसेच कापूस आयातही होत आहे. त्यामुळे देशातील बाजारात कापसाच्या दरावर दबाव दिसून येत आहे.

यंदाच्या हंगामात अगदी सुरुवातीपासूनच कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे. कापसाचा भाव यंदा हमीभावाच्या पुढे गेलाच नाही. सरकारने यंदा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार १२१ रुपये महीभाव जाहीर केला. तर लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ५२१ रुपये हमीभाव जाहीर केला. पण बाजारात यंदा ७ हजार ५०० च्या पुढे भाव गेला नाही. शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीपासूनच ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला होता. कापसाचा भाव दबावात असल्याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसला.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावात आहेत. भारतात कापूस आयातीवर ११ टक्के शुल्क लागू आहे. असे असातानाही काही प्रमाणात कापासाची आवक सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा दबाव देशातही दिसून येत आहे. अमेरिकेचा वायदे बाजार ६७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान दिसत आहे. तर काॅटलूक ए इंडेक्स ७८ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान दिसत आहे. तर भारताचा कापूस यापेक्षा जास्त पडतो. यामुळे निर्यातीवर काही मर्यादा येत आहे.

भारताच्या कापसाचा मोठा ग्राहक बांगलादेश आहे. परंतु बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीचा फटका येथील कापड उद्योगाला बसत आहे. त्यामुळे निर्यात कमी झाली. तर पाकिस्तानला विदेशी चलनाची टंचाई भासत आहे. चीनकडूनही अपेक्षित असा उठाव सध्या नाही. याचा परिणाम कापसाच्या भावावर दिसत आहे. पण पुढील काही आठवड्यांमध्ये या सर्व आघाड्यांवर सकारात्मक घडामोडी घडण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कापसाला उठाव मिळू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ravikant Tupkar: 'ही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीची लढाई'; रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली, पण अन्नत्याग आंदोलनावर ठाम

Women Development Corporation: ‘माविम’मुळे जिल्ह्यातील २१ हजार महिला स्वावलंबी

Youth Inspiration: मोझरीच्या मातीतून घडला ‘लेफ्टनंट’

Women SHGs: महिला समूहांना एक हेक्टर पडीक जमीन देणार : बावनकुळे

Parbhani DCC Bank: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक कार्यक्रम जाहीर

SCROLL FOR NEXT