Agricultural Policy: वायदे बाजारामुळे शेतीमालाच्या किंमत निश्चितीची शक्ती मूठभर व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडे सरकत आहे. वायदे बाजार हा व्यापाऱ्यांसाठी पोटदुखी ठरत आहे. त्यामुळेच संधी मिळाली की वायदेबंदी करा, अशी पहिली मागणी व्यापारी करतात. शेतीमालाचे भाव वाढत असले, की केंद्र सरकारचा ग्राहक धार्जिणेपणा तत्काळ जागृत होतो. मुक्त आयात, निर्यात निर्बंध, साठा मर्यादा याचबरोबर मागील काही वर्षांपासून वायदे बंदी या नव्या अस्त्राचा उपयोग देखील दर नियंत्रणासाठी केंद्र सरकार करीत आहे. .सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सात प्रमुख शेतीमालाच्या वायदे बाजारावर केंद्र सरकारने बंदी घातली. त्यावरील बंदी उठविण्याची मागणी शेतकरी करीत असताना त्याला वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. त्यातच आता निजामाबाद येथील ‘एनसीडीईक्स’च्या (नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्हज एक्स्चेंज) गोदामांमध्ये कमी गुणवत्तेच्या हळदीची भेसळ झाल्यामुळे हळदीच्या वायद्यांवरच बंदी घालण्याची अवास्तव-अजब मागणी व्यापाऱ्यांचा एक गट करीत आहे..Turmeric Market: हळदीचे वायदे बंद करण्याची व्यापाऱ्यांची मागणी.तर व्यापाऱ्यांचा दुसरा गट आणि शेतकरी या मागणीच्या विरोधात आहेत. हा प्रकार म्हणजे योजना चांगली असताना तिच्या अंमलबजावणीत कुणी काही चूक अथवा गैरप्रकार केले तर ती चूक दुरुस्त करायचे सोडून, त्यातील गैरप्रकार दूर करायचे सोडून योजनाच बंद करा, अशी मागणी करण्यासारखा म्हणावा लागेल. मुळात एनसीडीईएक्सने हळदीच्या गुणवत्तेचे निकष ठरवून दिले आहेत. या निकषांचे पालन करण्याचे काम गोदाम व्यवस्थापनाचे आहे. अशावेळी गोदामात भेसळ झाली तर त्यासाठी एनसीडीईएक्स नाही तर गोदाम व्यवस्थापन जबाबदार आहे..हळद उत्पादनात आता सांगली पाठोपाठ मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली हे जिल्हे आघाडी घेत आहेत. या जिल्ह्यांना लागून असलेल्या विदर्भातील यवतमाळ, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांतही हळद क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे वसमत ही हळदीसाठी राज्यातच नव्हे तर देशात मोठी बाजारपेठ म्हणून उदयाला आली आहे. मागील काही वर्षांपासून हळदीला सोयाबीन, कापूस या शेतीमालाच्या तुलनेत दरही चांगला मिळत आहे. त्यातूनच हळदीचे बेंचमार्क मार्केट निजामाबाद ऐवजी वसमत असावे, अशी मागणी या भागातील हळद उत्पादकांची आहे..Turmeric Production: देशात हळदीच्या क्षेत्रात २५ टक्क्यांनी वाढीचा अंदाज.अशावेळी या मुद्द्यापासून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याच्या हेतूने हळद वायदेबंदीचा मुद्दा पुढे केला जात असल्याची चर्चा आहे. वायदे बाजारामुळे जागतिक व राष्ट्रीय पातळीवर मागणी असलेल्या शेतीमालाची शेतकऱ्यांना माहिती मिळते. दीर्घ कालावधी, अल्प मुदतीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार कळतात. शेतीमाल भावपातळीचे कल कळतात. त्यातून शेतीमाल विक्रीचा शेतकऱ्यांना अंदाज बांधता येतो..वायदे बाजारात शेतकऱ्यांनी थेट व्यवहार केला नाही, तरी शेतकऱ्यांना हजर बाजारात किफायती दर मिळण्यासाठी हे माध्यम अप्रत्यक्षरीत्या उपयुक्त ठरते. अशा वेळी वायदे बाजारात अधिकाधिक शेतीमाल आणून त्याचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचतील हे पाहणे गरजेचे असताना सरकार मात्र वायदेबंदीवर अडून बसले आहे. हर्षद मेहता प्रकरण घडले म्हणून शेअर बाजार बंद केला गेला नाही; तर ‘सेबी’च्या रूपाने बळकट नियामक यंत्रणा आणून कारभार पारदर्शक करण्याचा प्रयत्न झाला. हळदीचे वायदे बंद करण्याची मागणी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे हळदीचे वायदे बंद न करता त्यात सुधारणा करायला हवी. तसेच एकंदरीतच देशातील शेतीमाल वायदे बाजारात पारदर्शकता आणण्यासाठी नवी रचना विकसित करण्यावरही विचार व्हायला हवा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.