Cotton Procurement : ‘सीसीआय’च्या कापूस खरेदीला पुसदमध्ये ब्रेक

Cotton Market : साठा जास्त झाल्याचे कारण देत पुसद बाजार समिती अंतर्गंत असलेली कापूस खरेदी शुक्रवार (ता.१०) पासून मंगळवार (ता. १४) पर्यंत बंद ठेवण्याचे पत्र सीसीआयकडून देण्यात आले आहे.
Cotton Procurement
Cotton ProcurementAgrowon
Published on
Updated on

Yavatamal News : साठा जास्त झाल्याचे कारण देत पुसद बाजार समिती अंतर्गंत असलेली कापूस खरेदी शुक्रवार (ता.१०) पासून मंगळवार (ता. १४) पर्यंत बंद ठेवण्याचे पत्र सीसीआयकडून देण्यात आले आहे.

दरम्यान बाजार समिती प्रशासनाने मात्र जिनींगमधील साठ्याची उचल झाल्यानंतर खरेदी पुन्हा सुरु केली जाईल, असे सांगितले. सीसीआयच्या पत्रानुसार, आयशर, ७०९, डबल टायर, टेम्पो व मोठ्या वाहनात कापूस विक्रीसाठी आणल्यास त्याची खरेदी केली जाणार नाही.

त्यासोबतच खरेदी संदर्भातील सॉफ्टवेअर प्रणाली सहा वाजता बंद केली जाणार आहे. त्यामुळे सायंकाळी चार वाजेपर्यंत आलेली वाहनेच मोजणीकामी सीसीआय केंद्राच्या आत पाठविण्यात येणार आहेत. सातबारावर नोंद असेल तितकाच कापूस विक्रीसाठी आणावा.

Cotton Procurement
Cotton MSP : ‘सीसीआय’ने कापसाचा हमीदर शंभर रुपयांनी घटविला

सातबारा एडिट करून त्यावर कापसाचा वाढीव पेरा दर्शविण्यात आल्यास अशा प्रकरणात चुकाऱ्याची जबाबदारी शेतकऱ्याची राहील. बाजार समिती किंवा सीसीआय त्याकरिता बांधील राहणार नाही, असे स्पष्टपणे पत्रात नमूद करण्या आले आहे.

Cotton Procurement
Cotton Industry : पांढऱ्या सोन्याची काळी कहाणी

पुसद बाजार समिती अंतर्गंत दोन खरेदी केंद्र असून त्या केंद्रांवर ५० ते ६० वाहने रोज सोडण्यात येत असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून या पार्श्‍वभूमीवर देण्यात आली आहे.

दोन खरेदी केंद्राच्या माध्यमातून पुसद बाजार समिती अंतर्गंत ३५ हजार क्‍विंटल कापसाची खरेदी आजवर करण्यात आली आहे. कापूस विक्रीसाठी अद्यापही तीन केंद्रावर नोंदणी सुरुच आहे. जिनींगमधील कापसाची उचल झाल्यानंतर खरेदी पुन्हा सुरु करण्यावर भर राहील.
- कौसर शेख, सभापती, बाजार समिती, पुसद, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com