Vegetable Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chakan Vegetable Market : उन्हाळ्यातही कोथिंबीर मातीमोल

Vegetable Market Update : चाकण येथील बाजारात हिरव्या वाटाण्याची मध्य प्रदेश व राजस्थान राज्यातून आवक झाली. हिरव्या वाटण्याला मागणी वाढते आहे.परंतु आवक फारच घटलेली आहे.

Team Agrowon

Pune News : येथील महात्मा फुले बाजारात सुमारे पन्नास हजार कोथिंबिरीच्या जुड्यांची आवक झाली. कोथिंबिरीचे भाव घसरले आहेत. अगदी दहा रुपयाला तीन जुड्या बाजारात विकल्या जात आहे. त्यामुळे कोथिंबिरीचे ढीग तसेच पडून आहेत. कोथिंबीर मातीमोल झाल्यामुळे शेतकरी चिंता करत आहेत.

कांद्याची आवक रविवारी (ता. ६) सुमारे पाच हजार क्विंटल झाली. कांद्याला प्रति किलोला किमान १० रुपये तर कमाल १६ रुपये भाव मिळाला. कांद्याचे भाव घसरले आहेत परंतु स्थिर आहेत ते वाढण्याची शक्यता मात्र शेतकरी, व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. टोमॅटो, फ्लॉवर, कोबीचे भाव फारच घसरले आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी मात्र चिंतेत आहे.

चाकण येथील बाजारात हिरव्या वाटाण्याची मध्य प्रदेश व राजस्थान राज्यातून आवक झाली. हिरव्या वाटण्याला मागणी वाढते आहे.परंतु आवक फारच घटलेली आहे. हिरव्या वाटाण्याला घाऊक बाजारात प्रति किलोला ५५ रुपये भाव मिळाला. बुलढाणा, नंदुरबार जिल्ह्यातून हिरव्या मिरचीची सुमारे पन्नास टन आवक झाली. हिरव्या मिरचीला घाऊक बाजारात प्रति किलोला ४० ते ६० रुपये भाव मिळाला.अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे,उपसभापती क्रांती सोमवंशी,सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

लसुणाची आवक वीस क्विंटल झाली. घाऊक बाजारात लसूण साठ ते शंभर रुपये प्रति किलोने विकला जात आहे. लसणाचे भाव घसरले आहेत. बटाट्याची आवक पंधराशे क्विंटल झाली. बटाट्याला प्रति किलोला दहा ते अठरा रुपये भाव मिळाला. बाजारात इंदोर, आग्रा येथून बटाट्याची आवक होत आहे तसेच स्थानिक काढणी केलेल्या नवीन बटाट्याची अल्प प्रमाणात आवक होत आहे.किरकोळ बाजारात बटाटा प्रति किलोला तीस, चाळीस रुपये भावाने विकला जात आहे.

बाजारात कोथिंबीर, मेथीच्या सुमारे पन्नास हजारांवर जुड्यांची आवक झाली. मेथीची एक जुडी सात ते बारा रुपयाला विकली गेली. कोथिंबीरीची एक जुडी पाच ते नऊ रुपयाला विकली गेली. शेपूची एक जुडी पाच ते दहा रुपयाला विकली गेली. पालकच्या पाच हजार जुड्यांची आवक झाली. एक जुडी चार ते सात रुपयाला विकली गेली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT