Vegetable Production : कडक उन्हात भाजीपाला टिकविण्याचे संकट ; तापमानाचा पारा पोहोचला ४० अंशांवर, दौंडमधील शेतकरी हवालदिल

High Temprature : तापमानाचा पारा ४० अंशांकडे पोहोचल्यामुळे दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसमोर वाढत्या उन्हाळ्यात भाजीपाला टिकविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Vegetable Farming
Vegetable Farming Agrowon
Published on
Updated on

Vegetable Farming : राजेगाव, ता. दौंड : तापमानाचा पारा ४० अंशांकडे पोहोचल्यामुळे दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसमोर वाढत्या उन्हाळ्यात भाजीपाला टिकविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकांना बाजारात चांगला बाजारभाव मिळतो. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार या भागातील शेतकरी कमी-अधिक प्रमाणात भाजीपाल्याची लागवड करत आला आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे जरी उत्पादन कमी मिळाले तरी बाजारभाव चांगला मिळत असल्याने भाजीपाला लागवडीकडे बोरिबेल, गाडेवाडी, लोणारवाडी, स्वामी-चिंचोली, मळद, देऊळगाव राजे, मलठण, राजेगाव, वाटलुज, नायगाव आणि खानवटे या गावातील शेतकऱ्यांचा विशेष कल दिसून येत आहे.

Vegetable Farming
Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाचा तडाखा! तापमानाचा पारा ३६ अंशांवर

उन्हाळी हंगामामध्ये प्रामुख्याने काकडी, कलिंगड, खरबूज, कारली, दोडका, दुधी भोपळा, तांबडा भोपळा, घोसाळी, भेंडी, गवार, मिरची आणि टोमॅटो इत्यादी भाजीपाला पिकांचा समावेश असतो. उन्हाळी हंगामात भाजीपाला पिकांचे दर्जेदार व अधिक उत्पादन मिळविण्यासाठी तांत्रिक बाबी विचारात घेऊन सुयोग्य नियोजन करणे आवश्यक असते. जेणेकरून दर्जेदार उत्पादन मिळून चांगला बाजारभाव मिळेल.

तापमान वाढल्यास फुलगळ

उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. तसेच या हंगामातील लागवडीमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने अधिक असतो. त्यामुळे उत्पादनात घट येते. तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गेल्यास फूलगळ होते. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला पिकांची लागवड करताना योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.

उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचे घटक

 लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड

 कीड-रोग प्रतिकारक तसेच दर्जेदार उत्पादन, अधिक तापमानास सहनशील वाणांची निवड.

बियाणे प्रमाण व बीजप्रक्रिया, आच्छादनाचा वापर.

 ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब.

 शिफारशीत रासायनिक खतांचा संतुलित वापर.

वाढीच्या अवस्थेनुसार योग्य संजीवकांचा वापर.

टोमॅटो व वेलवर्गीय भाज्यांसाठी आधार देणे.

 रोपवाटिका ते फळधारणा अवस्थेपर्यंत एकात्मिक कीड-रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब.

 उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी सच्छिद्र प्लॅस्टिक जाळीचा (शेडनेट) वापर.

उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला पिकावरही विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. यासाठी मुख्यत: पांढरीमाशी, मावा, तुडतुडे, यांसारख्या रस शोषित किडी या रोगाचा प्रसार करीत असतात. त्यामुळे यांचा प्रादुर्भाव रोखावा लागतो.

- शिवाजी कदम, कृषी सहाय्यक, खानवटे (ता. दौंड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com