Fertilizer Scam: भोकर तालुक्यातील बलाळ तांडा येथे शेतकऱ्यांना भेसळयुक्त खताची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून ६० पोती खत आणि वाहतूक करणारे वाहन जप्त केले. या कारवाईत सुमारे ७.०८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..भोकर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे गुणनियंत्रण अधिकारी प्रमोद कद्रेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर जिल्हास्तरीय भरारी पथकाचे प्रमुख सचिन कपाळे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अमोल पेकाम, लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे गुणनियंत्रण तंत्र अधिकारी बालाजी मुंडे तसेच पंचायत समितीचे गुणनियंत्रण कृषी अधिकारी संदीप कोस्केवार यांच्या पथकाने बलाळ तांडा येथे छापा टाकला..Fake Fertilizer Sale : बनावट खत विक्रीबद्दल वर्षभरात २४ परवाने निलंबित.यावेळी शेतकऱ्यांना विनापरवाना व ई-पॉस यंत्रणेशिवाय खत विक्री सुरू असल्याचे आढळून आले. अशोक लेलँडच्या मालवाहू वाहनातून शेतकऱ्यांना खताची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ‘प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना भारत २०:२०:०:१३’ असे नमूद असलेल्या खताची ५० किलो वजनाची ६० पोती आढळून आली. प्राथमिक पाहणीत हे खत भेसळयुक्त असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला..Fertilizer Dealer Action: खत लिंकिंग केल्यास संबंधित विक्रेत्यावर होणार कठोर कारवाई: कृषी अधिकारी विवेक कुंभार .भाग्यलक्ष्मी ॲग्रो बायोटेकचे संचालक बालाजी करंडेकर यांच्या कृषी सेवा केंद्रामार्फत शेतकऱ्यांना ई-पॉस प्रणालीचा वापर न करता खत विक्री करण्यात येत असल्याचे तपासात समोर आले. शेतकऱ्यांकडील पावत्या व व्यवहारांच्या नोंदींचीही तपासणी करण्यात आली. .कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या खताची किंमत १.०८ लाख रुपये, तर मालवाहू वाहनाची किंमत सुमारे ६ लाख रुपये असल्याने एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ७.०८ लाख रुपये इतकी आहे. कृषी विभागाने बालाजी करंडेकर (रा. मुदखेड रोड, भोकर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संशयित खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विविध कलमान्वये भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.