Chana Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Rate Today: हरभरा, मसूरचा भाव हमीभावापेक्षा कमी; गव्हाला दोन महिन्यांपासून अधिक दर

Market Rate Update: खरिपातील पिकांना हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यानंतर रब्बी पिकांनाही कमी दर मिळत आहे. रब्बीतील हरभरा, मसूर आणि मोहरी पिकांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे.

Anil Jadhao 

Pune News: खरिपातील पिकांना हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यानंतर रब्बी पिकांनाही कमी दर मिळत आहे. रब्बीतील हरभरा, मसूर आणि मोहरी पिकांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. तर गव्हाचे भाव हमीभावापेक्षा काहीसे अधिक आहे. महत्वाच्या पिकांचे भाव कमी असल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. 

खरिपातील महत्वाच्या कापूस आणि सोयाबीन पिकांना यंदा हमीभावापेक्षा कमी दर मिळाला. सोयाबीनचे भाव तर उत्पादन खर्चापेक्षाही कमी आहेत. त्यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकांकडून अपेक्षा होती. २०२४ मध्ये पावसाळा चांगला झाल्याने उत्पादनही गेल्यावर्षीपेक्षा चांगले आले. मात्र तरीही रब्बी पिकांकडून शेतकऱ्यांची निराशा होत आहे. उत्पादन चांगले येऊनही बाजारभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. 

केंद्र सरकारने यंदा गव्हासाठी २ हजार ४२५ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र मार्च आणि एप्रिल महिन्यात गव्हाचे भाव हमीभावापेक्षा जास्त होते. मार्च महिन्यात गव्हाचे सरासरी भाव २ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. तर एप्रिल महिन्यात आवक वाढल्याने दर काहीसे कमी झाले. एप्रिल महिन्यात गव्हाचा सरासरी भाव २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होता. 

देशात यंदा गव्हाची लागवड वाढली होती. त्यामुळे सुरुवातीपासून उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे गव्हाचे भावही कमी होत होते. मात्र, गव्हाची काढणी सुरु झाल्यानंतर उत्पादकता स्पष्ट झाली. उत्पादनात मोठी वाढ नसल्याचे लक्षात आल्यानंतर गव्हाच्या दरात पुन्हा काहीशी वाढ झाली होती. त्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्यात गव्हाचे भाव हमीभावापेक्षा कमी होते. यापुढे गव्हाचे भाव सरकारची खरेदी आणि विक्री यावर अवलंबून राहणार आहे. सरकारची खरेदी ३१० लाख टनांपेक्षा जास्त झाल्यास याचा दरावर दबाव राहील. 

हरभऱ्याचे भाव कमी

चालू हंगामात हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. सरकारने यंदा हरभऱ्याला ५ हजार ६५० रुपये हमीभावा जाहीर केला. मात्र सध्या हरभऱ्याला सरासरी ५ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. हरभरा बाजारावर वाढत्या आयातीचा दबाव आहे. सरकारला यंदा हमीभावाने खूपच कमी हरभरा मिळत आहे. त्यामुळे भविष्यात किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार आयात वाढवत आहे. 

मसूरचे भावही कमीच

देशात यंदा मसूरचे उत्पादन सरासरी राहण्याचा अंदाज आहे. मात्र वाढत्या मसूर आयातीचा दरावर दबाव दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात मसूरची विक्रमी आयात झाली. याचा दबाव दरावर आला. सरकारने यंदा मसूरला ६ हजार ७०० रुपये हमीभाव जाहीर केला. तर बाजारात सध्या ६ हजार १२७ रुपयांचा दर मिळत आहे. तसेच मोहरीला यंदा ५ हजार ९५० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तर बाजारात सध्या मोहरीला ५ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT