Latest Agriculture News : भारतीय मसालेवर्गीय पदार्थांची युरोपीय देशांना निर्यात करताना इथिलीन ऑक्साईड (इटीओ) या घटकाचा आढळ नसल्याची ग्वाही देणारे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे देणे आता बंधनकारक ठरणार आहे.
युरोपीय महासंघाने भारतीय मसाला मंंडळाला या कायदेशीर नियमावलीच्या अनुषंगाने २०२१ मध्ये परिपक्षक जारी केले होते. त्या अंमलबजावणीचा भाग म्हणून भारतीय मसाले मंडळाकडून संमत झालेला पृथ्थकरण अहवाल निर्यातक्षम भारतीय मसाले उत्पादनांसोबत भारतीय निर्यातदारांना सादर करावा लागणार आहे.
भारत देशातून मसालावर्गीय उत्पादनांमध्ये इथिलीन ऑक्साईड घटकाचे प्रमाण ‘एमआरएल’ पेक्षा अधिक आढळल्याने गेल्यातवर्षीच्या तुलनेत सुमारे सव्वा लाख टनांनी मसाल्यांची निर्यात घटल्याची माहिती मसले मंडळाने दिली आहे.
मसालेवर्गीय उत्पादनांची टिकवणक्षमता वाढवण्यासाठी म्हणजेच त्यातील सूक्ष्मजीवांचा संसर्ग वा प्रतिबंध टाळण्यासाठी इथिलीन ऑक्साईडचा वापर काढणी पश्चात म्हणजे प्रक्रिया यंत्रणेत केला जातो. मात्र या घटकाचा मानवी आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन त्याच्या ‘एमआरएल’ युरोपीय महासंघाकडून निश्चित करण्यात आल्या आहेत.
भारतात मसाल्याच्या ७५ वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचे उत्पादन होते. अमेरिका, इंडोनेशिया, सौदी अरेबिया, बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया, जपान, युरोप यासह अनेक देशांमध्ये मसाल्यांची निर्यात होते.
देशातून २०१७-१८ पासून काळी मिरी, वेलची, मिरची, हळद, आले, यासह अनेक मसाल्यांच्या जागतिक बाजारपेठेत निर्यातीत वाढ होऊ लागल्याचे स्पाइईस बोर्डाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.
जागतिक बाजारपेठेत देशातून ८ हजारांहून अधिक निर्यातदार आहेत. त्यांच्यामार्फत मसाल्यांची निर्यात होते. त्यामध्ये इटीओचे प्रमाण मर्यादेपेक्षा वाढले असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळेच भारतीय मसालेवर्गीय पदार्थांची युरोपीय देशांना निर्यात करताना इटीओ या रसायनाचा आढळ नसल्याची ग्वाही देणारे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
युरोपीय महासंघाने भारतीय मसाला मंडळाला या कायदेशीर नियमावलीच्या अनुषंगाने २०२१ मध्ये त्या अनुषंगाने परिपत्रक जारी केले होते. त्या अंमलबजावणीचा भाग म्हणून भारतीय मसाले मंडळाकडून संमत झालेला पृथ्थकरण अहवाल निर्यातक्षम भारतीय मसाले उत्पादनांसोबत भारतीय निर्यातदारांना सादर करावा लागणार आहे.
युरोपीय महासंघाकडून मसालेवर्गीय उपादनांतील इथिलीन ऑक्साईडची एमआरएल ०.१ मिलीग्रॅम प्रति किलो अशी निश्चित केली आहे. तर मिरची, त्यावर आधारित उत्पादने तसेच आले व त्यावर आधारित उत्पादनांसाठी या घटकाची एमआरएल ०.०२ मिली ग्रॅम प्रतिकिलो अशी निर्धारित केली आहे.
सौदी देशाचीही नियमावली
सौदी अरब देशांमध्ये छोटी वेलची निर्यात करण्यासाठी देखील अशा प्रकारच्या अटींचे पालन भारतीय निर्यातदारांना करावे लागणार आहे. ‘सौदी फूड ॲण्ड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन’ (एसएफडीए) यांच्याद्वारे संमत असलेल्या भारतीय संस्थांकडून सीओसी (Certificate of Conformity) असे प्रमाणपत्र अत्यावश्यक करण्यात आले आहे.
१४३७ कोटींनी उलाढाल वाढली
देशातून २०२१-२२ या वर्षात मसाल्यांची ३० हजार ३२४ कोटींची उलाढाल झाली आहे. मात्र, २०२२-२३ या वर्षात मसाला निर्यात घटली असली तरी मसाल्याची ३१ हजार ७१६ कोटींची उलाढाल झाली आहे. अर्थात हळद, मिरची, जिरे, धने आणि लसूण याची निर्यात वाढली आहे. यामुळे १४३७ कोटींनी उलाढाल वाढली असल्याचे मसाला मंडळाच्या अहवालातून स्पष्ट केले आहे.
देशातून विविध मसाला पिकांची झालेली निर्यात
वर्ष.... निर्यात (टनांत)
२०१९-२०...१२,०८,४००
२०२०-२१...१७,५८,९८५
२०२१-२२...१५,३०,६६१
२०२२-२३...१४,०४,३५७
(आकडेवारी स्रोत स्पाइसेस बोर्ड)
इथिलीन ऑक्साईडची पातळी मर्यादेपेक्षा वाढल्याने मसाले उत्पादनांची निर्यात घटली आहे. निर्यातदारांना या घटकांबाबत विविध देशातील कायदेशीर नियमांबद्दल मसाला मंडळाकडून माहिती दिली जात आहे. त्यानुसार निर्यातदारांना आवश्यक ती मदत केली जात आहे.- डॉ. ममता रुपोलिया, सहायक निर्देशक निर्यात व विपणन मसाला मंडळ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.