Yellow Dragon Fruit Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Dragon Fruit Market : पुणे बाजार समितीत पिवळ्या ड्रॅगन फ्रूटची आवक

Pune APMC Fruit Market : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत (ता. ८) सांगली जिल्ह्यातील उटगी (ता. जत) येथील शेतकरी उमेश लिंगाडे यांच्या शेतातील सुमारे ३१ बॉक्स (२४८ किलो) पिवळ्या ड्रॅगन फ्रूटची आवक झाली.

Team Agrowon

Pune News : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत (ता. ८) सांगली जिल्ह्यातील उटगी (ता. जत) येथील शेतकरी उमेश लिंगाडे यांच्या शेतातील सुमारे ३१ बॉक्स (२४८ किलो) पिवळ्या ड्रॅगन फ्रूटची आवक झाली. लिंगाडे हे लाल ड्रॅगन फ्रूटची गेल्या ८ ते ९ वर्षांपासून यशस्वी शेती करीत आहेत.

मात्र नव्या पिकाच्या शोधात त्यानी २०२१ मध्ये सव्वा एकर क्षेत्रावर पिवळ्या ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. पिवळ्या आकर्षक ड्रॅगन फ्रूटला मागणी असल्याने रविवारी (ता. ८) पुणे बाजार समितीमधील रावसाहेब कुंजीर यांच्या गाळ्यावर प्रति किलोला १२० ते २०० रुपये दर मिळाल्याचे लिंगाडे यांनी सांगितले.

लिंगाडे यांनी सव्वा एकर क्षेत्रावर ५०० खांबावर दोन हजार रोपांची लागवड केली आहे. याचे उत्पादन सुरू झाले असून, रविवारी (ता. ८) पहिलीच आवक बाजार समितीमध्ये आणल्याचे त्यांनी सांगितले. लाल आणि पिवळ्या ड्रॅगन फ्रूटविषयी लिंगाडे म्हणाले, की दोन्ही फळांमध्ये विशेष फरक नाही.

मात्र पिवळ्या फळाचे साल कडक आणि जाड असल्याने याची टिकवण क्षमता लाल फळापेक्षा ८ ते १० दिवसांनी अधिक आहे. तर पिवळ्या फळाचा गर पांढरा असून, तुलनेने गोड आहे. आणखी पिवळ्या फळांची बाजारात आवक कमी असल्याने मागणी चांगली आहे. वेगळे आणि आकर्षक फळ म्हणून मागणी वाढत आहे.

आम्ही उमेश लिंगाडे यांच्या लाल ड्रॅगन फ्रूटची नियमित विक्री करत असतो. रविवारी त्यांच्या ३०० बॉक्सला (२४८) किलोमधील दर्जानुसार १२० ते २०० रुपये दर मिळाले. यामधील ८८ किलोला २०० रुपये, ५६ किलोला १५० आणि १३ किलोला १२० रुपये दर मिळाले. २४८ किलोची पट्टी ३८ हजार ३२० रुपये एवढी झाली.
- अमोल म्हस्के, अडतदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT