Dragon Fruit : ड्रगन फ्रूटच्या रोपांत फसवणूक केल्याने नुकसान

Dragon Fruit Fraud With Farmer : ड्रगन फ्रूट या फळपिकांची लागवड करण्यासाठी घेतलेल्या रोपांत विक्रेत्याकडून फसवणूक झाली. निकृष्ट दर्जाची रोपे दिल्याने दीड वर्षात लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
Dragon Fruit
Dragon FruitAgrowon

Nagar News : ड्रगन फ्रूट या फळपिकांची लागवड करण्यासाठी घेतलेल्या रोपांत विक्रेत्याकडून फसवणूक झाली. निकृष्ट दर्जाची रोपे दिल्याने दीड वर्षात लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

संबंधित रोपे विक्रेत्याने नुकसान भरपाई करण्यास टाळाटाळ करत असून त्याची चौकशी करून कारवाई करावी व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी लोणी मसदपूर (ता. कर्जत) येथील प्रगतिशील शेतकरी विष्णू कारभारी झगडे यांनी कृषी विभागाकडे निवेदन दिले आहे.

विष्णू झगडे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरिक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की लोणी मसदपूर जवळील जळकेवाडी शिवारात माझी शेती आहे. मिरजगाव (ता. कर्जत) येथील एका रोप विक्रेत्याकडून ड्रगन फ्रूटची १६०० रोपे खरेदी केली होती.

Dragon Fruit
Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट मुल्यवर्धनाचे तंत्र

प्रती रोपासाठी दोनशे रुपये याप्रमाणे ३ लाख २० हजार रुपये दिले. झाडांना दीड वर्षाने फळे लागली. मात्र, ठरल्याप्रमाणे फळ न येता वेगळ्याच रंगाची फळे येऊ लागली व सदर विक्रेत्याने निकृष्ट रोपे देऊन फसवणूक केल्याचे उघड झाले.

Dragon Fruit
Dragon Fruit Market : ड्रॅगन फ्रूटचे दर टिकून

आर्थिक आमिषे दाखवून विक्री

कर्जत तालुक्यात गेल्या वर्षीही दोन शेतकऱ्यांनी डाळिंबावर निकृष्ट दर्जाचे औषध फवारणी केल्याने सुमारे पंचवीस लाखांचे डाळिंब वाया गेले होते. त्यानंतर यंदा निकृष्ट रोपांमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.

निकृष्ट दर्जाच्या रोपांची विक्री, वेगवेगळ्या निकृष्ट विद्राव्य खते, जैविक खते, फवारणीसाठी औषधांचा सुळसुळाट झाला आहे. विक्रेत्यांना आर्थिक अमिषे दाखवली जात असल्याने विक्रेत्याकडूनही जोमाने विक्री केली जात असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे प्रकार घडत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com