Dragon Fruit Farming : व्हिएतनामच्या धर्तीवर कसमादेत ड्रॅगन फ्रूट शेती

Horticulture : राज्यात विविध फळपिकांचा विस्तार होत आहे. बाजारपेठेतील मागणीनुसार प्रायोगिक तत्त्वावर लागवडी वाढत आहेत.
Dragon Fruit Farming
Dragon Fruit Farming Agrwoon

Nashik News : राज्यात विविध फळपिकांचा विस्तार होत आहे. बाजारपेठेतील मागणीनुसार प्रायोगिक तत्त्वावर लागवडी वाढत आहेत. त्याच अनुषंगाने व्हिएतनाम हे ड्रॅगन फ्रूट शेतीचे माहेरघर आहे. येथे फळ लागवड ते उत्पादन संबंधी शास्त्रीय माहिती घेण्याच्या उद्देशाने कसमादेतील शेतकऱ्यांनी व्हिएतनाम येथे अभ्यास दौरा करून तेथील ड्रॅगन फ्रूट शेतीची माहिती घेतली.

लागवड, पिकाची निगा, बाजारपेठ आदींची माहिती जाणून घेत आपल्या भागातही अशाच स्वरूपाच्या शेतीचा प्रयोग करण्याचा निर्धार या वेळी कसमादेतील शेतकऱ्यांनी व्यक्त केला. कसमादे परिसरातील शेतकरी प्रयोगशील आहेत.

Dragon Fruit Farming
Dragon Fruit Crop : अति पावसापासून परागीभवन क्रिया वाचविणारे तंत्र

डाळिंब, द्राक्ष, पेरू, आंबा, पपई, मोसंबी, ॲपल बोर, टरबूज, खरबूज, सीताफळ, अंजीर आदी फळांची शेती केली जाते. मात्र त्यात अडचणी आहेत. वेगळा प्रयोग म्हणून काही शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग केला आहे. मात्र तो अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाला नाही.

यामुळे त्यातील शास्त्रीय पद्धतीने कामकाज समजून घेण्यासाठी महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघाचे उपाध्यक्ष कृषीभूषण अरुण देवरे, पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश कुलकर्णी, ड्रॅगन फ्रूट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मधुकर पोतदार आदींसह महाराष्ट्रातील २५ शेतकऱ्यांनी नुकताच व्हिएतनामचा दौरा केला.

Dragon Fruit Farming
Dragon Fruit Market : ड्रॅगन फ्रूटच्या दरात ६० रुपयांची वाढ

दौऱ्यात होची मिंट या शहरापासून जवळच मोठ्या प्रमाणावर ड्रॅगन फ्रूटची शेती केली जाते. या वेळी शेतकऱ्यांनी रेड जम्बो ड्रॅगन शेतीची त्यांनी पाहणी केली. येथे लागवड बारा बाय आठ व दहा बाय आठ अशा अंतरावर करण्यात आली आहे.

ड्रॅगन फ्रूट शेती करताना ५ फुटी पोलचा वापर करण्यात आला असून ते एक फूट जमिनीत व चार फूट वरती आहे. रिंग किंवा चौकोनी फ्रेमऐवजी वरती चार गज काढलेले आहेत. एका बाजूला एक फांदी या प्रमाणे चार फांद्या पोलवर विरुद्ध दिशेने टाकलेल्या असतात.

दोघा बाजूंना दोन लॅटरल अशी या शेतीची रचना असते. या वेळी येथील शेतकऱ्यांनी या फळपिकांची व्हिएतनाम सरकारच्या शासकीय फलोत्पादन संशोधन संस्थेत माहिती जाणून घेतली. यात रोग, जाती, अडचणी, बाजारपेठ आदींची माहिती घेतली.

आठ दिवसांच्या या दौऱ्यात शेतकऱ्यांनी व्हिएतनामच्या विविध भागांना भेटी देऊन तेथील शेती व इतर माहिती जाणून घेतली. व्हिएतनाम दौऱ्यावर गेलेले शेतकरी ड्रॅगन फ्रूट शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहेत.

हवामान बदलामुळे द्राक्ष, डाळिंब पीक मर आणि तेलकट डाग रोगामुळे अडचणीत आहे. मात्र ड्रॅगन फ्रूट पिकात ही आव्हाने नाहीत. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटला सध्या चांगली मागणी आहे. शेतकऱ्यांना द्राक्षे, डाळिंबऐवजी ड्रॅगन फ्रूट पर्याय चांगला आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे हे पीक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल. साबरवर संशोधन केलेले हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले आहे. सध्या शंभर ते २४० रुपये किलोने भाव आहे. तरुण शेतकऱ्यांनी पिकाचा अभ्यास करून ड्रॅगन शेती विकसित करावी.
- अरुण देवरे, कृषिभूषण, दाभाडी, ता. मालेगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com